महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अमन सुणगारची सुवर्ण कामगिरी

10:07 AM Jul 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्य जलतरण संघटना आयोजित सबज्युनिअर व ज्युनिअर राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत स्वीमर्स, अॅक्वेरिअर्स क्लब व सेंटपॉल्स हायस्कूलचा  विद्यार्थी अमन अभिजित सुणगार याने या स्पर्धेत 4 सुवर्ण पदकासह वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे. बसवणगुडा-बेंगळूर येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या जलतरण स्पर्धेत स्वीमर्स व अॅक्वेरिअर्स क्लबचा खेळाडू अमन अभिजित सुणगार याने 50 मी., 100 मी. व 200 मी. बॅकस्ट्रोक स्पर्धेत सुवर्ण पदक त्याच प्रमाणे 4×100 मी. रिलेत  सुवर्ण पदक तर 4×200 मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेमध्ये कास्यपदक पटकाविले. या कामगिरीची दखल घेवून पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाची अमनची राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. त्याला प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगा व मधू एम. बी. यांचे मार्गदर्शन तर सेंटपॉलचे प्राचार्य फादर सिमॉन फर्नांडीस, व क्रीडा शिक्षक अॅथोनी डिसोजा यांचे प्रोत्साहन मिळत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article