महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘एंडलेस बॉर्डर्स’ला ‘सुवर्ण मयूर’

10:07 AM Nov 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मायकल डग्लस यांना ‘सत्यजित रे जीवनगौरव’ पुरस्कार :54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप,सात हजार प्रतिनिधी, 270 चित्रपटांचे प्रदर्शन

Advertisement

पणजी : ‘लाख कोशिश कर के भी कोई कोई सन्मान नहीं पाते! जिनके पास हुनर हैं वह सम्मान लिए बिना नहीं रहतें...’ अशाच पद्धतीने गोव्यातील 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) सर्व अडथळ्यांवर मात करीत अब्बास अमिनी दिग्दर्शित ‘एंडलेस बॉर्डर्स’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘सुवर्ण मयूर’ पुरस्कार प्राप्त केला. जर्मनी, इराण आणि झेक प्रजासत्ताक चित्रपट सिनेमातील उत्कृष्टतेसाठी दिग्गज हॉलिवूड अभिनेता मायकल डग्लस यांना ‘सत्यजित रे जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित केलेल्या समारोप सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. यावेळी प्रसिद्ध अभिनेता आयुष्यमान खुराणा व्यासपीठावर उपस्थित होते.  उपस्थितांमध्ये हॉलीवूड, बॉलीवूड चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार उपस्थित होते.

Advertisement

सिनेमाची जागतिक भाषा अर्थपूर्ण

पुरस्कारानंतर हॉलिवूड अभिनेता मायकल डग्लस यांनी जागतिक दर्जाचे चित्रपट निर्माते म्हणजे काय, याबाबत मत व्यक्त केले. चित्रपट केवळ भारतीय चित्रपट उद्योगाच्या विजयाचेच नव्हे तर क्रॉस कल्चर कलात्मक अभिव्यक्तीची अमर्याद क्षमता दर्शवतात. चित्रपट हे एकमेव माध्यम आहे जे विभाजनाच्या पलीकडे आहे आणि आपल्याला एकत्र आणण्याची आणि परिवर्तन करण्याची शक्ती आहे. सध्याच्या काळात सिनेमाची जागतिक भाषा पूर्वीपेक्षा अधिक अर्थपूर्ण आहे, असेही ते म्हणाले.

अडचणीविना परवानग्या, आवश्यक पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देऊन गोव्याला चित्रपट उद्योगासाठी स्वर्ग बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी दिली. राज्यातील चित्रपटांच्या शूटिंगसाठी सुव्यवस्थित प्रणालीद्वारे त्रासमुक्त चित्रपट शूटिंग आणि अनुभवासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री सावंत यांनी दिले.

गोवा चित्रपट निर्मात्यांचे नंदनवन

गोवा हे चित्रपट निर्मात्यांचे नंदनवन आहे, जे निसर्गरम्य, ऐतिहासिक आणि आधुनिक वातावरणाचे मिश्रण देते, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. इफ्फीमध्ये दाखवण्यात आलेले गोव्यातील चित्रपट समीक्षकांनी प्रशंसित केल्याची माहिती त्यांनी दिली. 54 व्या इप्फीमध्ये 7 हजार प्रतिनिधींनी उपस्थिती लावली. 78 देशांतील 270 चित्रपट प्रदर्शित करण्यात आले होते, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

डग्लस यांनी गोव्यात चित्रपट निर्मिती करावी

हॉलिवूड चित्रपट निर्माते व दिग्गज अभिनेते मायकेल डग्लस यांनी आपला पुढील चित्रपट प्रकल्प गोव्यात आणल्यास त्याचे स्वागत आहे. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न करावा, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

मै भारतीयोंसे प्यार करता हूँ

पुरस्कारानंतर डग्लस यांना आयुष्यमान खुराणा यांनी केलेल्या विनंतीनुसार डग्लस यांनी “मै आप सभी भारतीयोंसे प्यार करता हूँ, भारत के लोंग बहुत अच्छे हैं!” अशा शब्दांत आपले भारताविषयीचे प्रेम व्यक्त केले.

54 व्या इफ्फी महोत्सवातील पुरस्कार

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article