रशियात एमबीबीएससाठी तरुणांना सुवर्णसंधी
एसबीईएसचे संचालक डॉ. सूरज अनगोळकर यांचे प्रयत्न सार्थकी
बेळगाव : शाईन ब्राईट शैक्षणिक सेवांच्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीने रशियातील ओमस्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये यशस्वीपणे प्रगती केली आहे. ज्यांनी नीट परीक्षेत प्रावीण्य मिळविले पण एमबीबीएससाठी भारतात जागा मिळाली नाही, त्यांच्यासाठी ही संधी एसबीईएसचे संचालक डॉ. सूरज अनगोळकर यांनी उपलब्ध करून दिली आहे. आजपर्यंत डॉ. अनगोळकर यांनी शेकडो विद्यार्थ्यांना रशियन विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी मदत केली आहे आणि हे शैक्षणिक वर्षही त्याला अपवाद नाही. नीट परीक्षेशी संबंधित असंख्य आव्हाने असूनही विद्यार्थी परदेशात अभ्यास करण्यासाठी लक्ष केंद्रित आणि दृढनिश्चयी राहिले. त्यापैकी मृणाली अष्टेकर या बी. के. कंग्राळीतील व उद्योगपती रमेश अष्टेकर यांची कन्या यांनी रशियाच्या प्रतिष्ठित विद्यापीठात प्रवेश मिळवून दिल्याबद्दल एसबीईएस टीमचे मनापासून आभार व्यक्त केले. याबाबत अधिक माहितीसाठी 9019949143 या क्रमांकावर व www.sbesstudyabroad.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा.