For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : कोल्हापूरातील शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना इस्त्रो भेटीची सुवर्णसंधी

05:37 PM Jan 06, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   कोल्हापूरातील शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना इस्त्रो भेटीची सुवर्णसंधी
Advertisement

                           कोल्हापूर महापालिकेचा अनोखा उपक्रम,

Advertisement

कोल्हापूर : महापालिका शाळा म्हंटलं की, अनेकजण नाक मुरडतात. मात्र. याच महापालिका शाळेतील २५ विद्यार्थी इस्त्रोकडे झेप घेणार आहेत. आपली कार्यकर्तुत्वता सिद्ध केली आहे. यामध्ये १३ विद्यार्थी व १२ विद्यार्थीनींचा समावेश असुन सदर विद्यार्थी आज विमानाने रवाना होणार आहेत.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समिती अंतर्गत येणाऱ्या महापालिकेच्या शाळांमधील शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) येथे अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सहलीअंतर्गत विद्यार्थ्यांना विमान प्रवासाचा अनुभव देण्यात येणार असून, हे विद्यार्थी मंगळवार दि.६ रोजी इस्त्रो अभ्यास सहलीसाठी विमानाने रवाना होणार आहेत.

Advertisement

या अभ्यास सहलीमध्ये १३ मुले व १२ मुली असे एकूण २५ विद्यार्थी, दोन मार्गदर्शक शिक्षक-शिक्षिका, एक अधिकारी व एक महिला डॉक्टर असा एकूण २९ जणांचा समावेश आहे.महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या प्रेरणेतून दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातील वैज्ञानिक दृष्ट्या महत्त्वाच्या संस्थांना भेट देण्याची संधी दिली जाते. या उपक्रमासाठी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्यात येते. असा उपक्रम सातत्याने राबविणारी कोल्हापूर महानगरपालिका ही राज्यातील एकमेव महानगरपालिका असल्याचे उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे यांनी सांगितले.
सदर सहलीसाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली असून, विमान प्रवास, इसरो येथील निवास व्यवस्था तसेच परतीच्या प्रवासाचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी महानगरपालिका मुख्य इमारत चौकातून केएमटी बसद्वारे विद्यार्थ्यांना विमानतळावर रवाना करण्यात येणार असून, यानिमित्त महापालिकेच्या चौकात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.