समशेरबाजीत द. कोरियाला सुवर्ण
06:00 AM Aug 02, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
पॅरिस : 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत द. कोरियाचा समशेरबाज ओ सेंगुकने आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर समशेरबाजी या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारातील अंतिम फेरीत द. कोरियाच्या सेंगुकने हंगेरीच्या अॅरॉन झिलागेईचा 45-41 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. सेंगुकचे हे समशेरबाजी या क्रीडा प्रकारातील दुसरे सुवर्णपदक आहे. पुरूषांच्या सांघिक सॅबेर समशेरबाजी प्रकारात द. कोरियाने हंगेरीचा 40-33 अशा गुणांनी पराभव केला. द. कोरियाच्या समशेरबाजांनी सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. हंगेरीला रौप्य पदक मिळविले. पुरूषांच्या सांघिक सॅबेर समशेरबाजी प्रकारात फ्रान्सने कास्य पदक मिळविताना इराणचा 45-25 असा पराभव केला.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article