महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पायल, निशा, आकांशा यांना सुवर्ण

06:26 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

अर्मेनियातील येरेव्हन येथे झालेल्या आयबीए ज्युनियर वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पायल, निशा व आकांशा यांनी सुवर्णपदके पटकावली. भारताने या स्पर्धेत एकूण 17 पदकांची कमाई केली.

Advertisement

भारतीय पथकाने 3 सुवर्ण, 9 रौप्य व 5 कांस्यपदके पटकावत पदकतक्त्यात संयुक्त दुसरे स्थान मिळविले. पायलने भारताला पहिले सुवर्ण मिळवून देताना 48 किलो गटाच्या अंतिम फेरीत अर्मेनियाच्या पेट्रोसियान हेगहाईनचा एकतर्फी पराभव केला. नंतर आशियाई युवा चॅम्पियन्स निशा व आकांशा यांनी अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन करीत सुवर्णपदके पटकावली. निशाने 52 किलो वजन गटाच्या अंतिम लढतीत ताजिकिस्तानच्या अब्दुल्लाओएव्हा फरिनोझचा 5-0 असा तर आकांशाने 70 किलो वजन गटाच्या अंतिम लढतीत रशियाच्या तैमाझोव्हा एलिझाव्हेटाचा याच गुणफरकाने पराभव केला. विनी (57 किलो गट), सृष्टी (63 किलो गट), मेघा (80 किलो गट) या अन्य तीन भारतीय महिलांना मात्र अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

पुरुष विभागात साहिल (75 किलो गट), हेमंत (80 किलोवरील गट) यांनाही अंतिम फेरीत प्रतिस्पर्ध्यांकडून 0-5 असा पराभव स्वीकारावा त्यांना रौप्य मिळाले. जतिनने 54 किलो गटाच्या लढतीत कझाकच्या तुलेबेक नुरास्सीलविरुद्ध जोरदार संघर्ष केला. पण त्याला अखेर 1-4 अशा गुणांनी पराभव पत्करावा लागल्याने त्यालाही रौप्य मिळाले. भारताच्या एकूण 12 भारतीय खेळाडूंनी अंतिम फेरी गाठली होती. अन्य कोणत्याही देशाच्या खेळाडूंना असा पराक्रम करता आला नाही.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#sports
Next Article