For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुलवीर सिंगला सुवर्ण, अंकिताला रौप्य

06:23 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुलवीर सिंगला सुवर्ण  अंकिताला रौप्य
Advertisement

वृत्तसंस्था/ तेहरान

Advertisement

आशियाई इनडोअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताचा धावपटू गुलवीर सिंगने पुरूषांच्या 3000 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविले. या स्पर्धेत भारताने 4 सुवर्णपदकांची कमाई केली आहे.

पुरूषांच्या 3000 मी. धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगने 8 मिनिटे, 07.48 सेकंदाचा अवधी घेत प्रथम स्थानासह सुवर्णपदक, किर्जीस्तानच्या नूर सुल्तानने 8 मिनिटे, 08.85 सेकंदाचा अवधी घेत रौप्य तर इराणच्या जलील नासेरीने 8 मिनिटे, 09.39 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक मिळविले.

Advertisement

या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महिलांच्या 3000 मी. धावण्याच्या शर्यतीत भारताच्या अंकिताने रौप्यपदक मिळविताना 9 मिनिटे, 26.22 सेकंदाचा अवधी घेतला. सदर स्पर्धेच्या पहिल्या दिवशी गोळाफेक धारक तेजिंदरपाल सिंग तूर, महिलांच्या 100 मी. अडथळ्याच्या शर्यतीत ज्योती याराजी तसेच 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत हरमिलन बैन्सने सुवर्णपदके मिळविली होती. या संपूर्ण स्पर्धेत भारताने 4 सुवर्ण आणि 1 रौप्य अशी एकूण 5 पदके मिळविली. यापूर्वी झालेल्या कझाकस्तानमधील आशियाई इनडोअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने 1 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 कांस्यपदक मिळविले होते.

Advertisement
Tags :

.