महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इथिओपियाच्या चेबेटला सुवर्ण

06:48 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/पॅरिस

Advertisement

2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या 5 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत इथोपियाची धावपटू बियाट्रिस चेबेटने सुवर्णपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात प्रामुख्याने तीन अव्वल वेगवान धावपटूमध्ये चुरस पहावयास मिळाली.

Advertisement

महिलांच्या 5 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत इथोपियाच्या चेबेटने 14 मिनिटे, 28.56 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या क्रीडा प्रकारातील विद्यमान विजेती हेसन आणि विद्यमान विश्वविजेती किपगॉन तसेच चेबेट यांच्यात शेवटच्या क्षणापर्यंत चुरस पहावयास मिळाली. दरम्यान इथोपियाच्या किपगॉनला शेवटच्या टप्प्यात अडथळा आणल्याने अपात्र ठरविण्यात आले. किपगॉन आणि सिगे यांच्यात ही घटना घडली. त्यामुळे नेदर्लंडच्या सिफेन हेसनला रौप्य पदक आणि इटलीच्या बॅटोक्लेटीला कास्यपदक मिळाले. या संपूर्ण शर्यतीमध्ये चेबेट आणि किपगॉन यांच्यातच आघाडीसाठी चुरस पहावयास मिळाली.

महिलांच्या 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत किली हॉजकिनसनने सुवर्णपदक पटकविताना 1 मिनीट 56.72 सेंकदाचा अवधी घेतला. हॉजकिनसनने इथोपियाच्या डुगूमा आणि केनियाच्या मेरी मोराला मागे टाकले. डुगूमाने         1 मिनिट 57.15 सेकंदाचा अवधी घेत रौप्य पदक तर मोराने 1 मिनिट 57.42 सेकंदाचा अवधी घेत कास्यपदक घेतले.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article