For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोने तस्करीच्या रॅकेटचा भांडाफोड

06:03 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
सोने तस्करीच्या रॅकेटचा भांडाफोड
Advertisement

सिलिकॉन बॉल्समधून 2 महिन्यात 267 किलो सोन्याची तस्करी

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडूतील साबीर अली नामक युट्यूबरला सोन्याच्या तस्करीसाठी अटक करण्यात आली आहे. तो आपल्या सहकाऱ्यांसह सोने तस्करीचे रॅकेट चालवित होता. गेल्या दोन महिन्यांमध्ये त्याने 167 कोटी रुपये किमतीच्या 267 किलो सोन्याची तस्करी केली असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

Advertisement

त्याने ही तस्करी करण्यासाठी सिलिकॉन बॉल्सचा उपयोग करण्याचे नवे तंत्र उपयोगात आणले होते. सिलिकॉन बॉल्समध्ये सोने घालून त्याचे कर्मचारी हे बॉल्स त्याच्या गुदद्वारात (गुप्तांगात) दडवीत असत आणि चेन्नई येथे आणत असत. तेथे आणल्यानंतर ते बॉल्स बाहेर काढले जात आणि ग्राहकांना दिले जात. ही त्याची पद्धती पाहून सीमाशुल्क अधिकारीही चक्रावून गेले आहेत. सिलिकॉन बॉल्समध्ये सोने दडविल्याने त्याचे सहजासहजी स्क्रीनींग होत नसे. अशाप्रकारे साधारणत: दोन महिने त्याने सीमाशुल्क अधिकाऱ्यांना गुंगारा दिला होता.

कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण

साबीर अली याचे युट्यूब चॅनेल आहे. ते तो नावालाच चालवित होता. त्याच्या चॅनेलमध्ये सात कर्मचारी होते. त्या सर्वांना त्याने सिलिकॉन बॉल्समध्ये सोने लपविण्याचे आणि हे बॉल्स गुदद्वारात दडवून विदेशातून चेन्नई येथे आणण्याचे प्रशिक्षण दिले होते. या कर्मचाऱ्यांचे कागदावर वेतन महिना 15,000 इतके होते. मात्र, सोने तस्करीच्या प्रत्येक फेरीमागे प्रत्येक कर्मचाऱ्याला 5 हजार रुपये दिले जात असत. एका फेरीत एक कर्मचारी 300 ग्रॅम ते 1 किलो सोन्याची तस्करी करत असे. अशा प्रकारे त्याच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये 267 किलो सोने आणले असावे असे प्राथमिक अनुमान आहे. मात्र, या प्रकाराचा पर्दाफाश विशेष प्रकारच्या क्ष किरण चाचणीतून झाला. साबीर अली याच्या एका कर्मचाऱ्याला 29 जूनला अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीवरुन सर्व कर्मचारी आणि साबीर अली यालाही अटक करण्यात आली आहे.

सखोल चौकशी केली जाणार

सोने तस्करीच्या या प्रकाराची कसून चौकशी केली जाणार असून हे तंत्र त्याने आणखी कोणाला शिकविले आहे काय, याचाही शोध लावला जाईल. त्याने आतापर्यंत किती सोने अशा प्रकारे भारतात आणले आहे याची माहिती त्याच्याकडून काढून घेतली जात आहे. त्याच्याकडून सोने विकत घेणाऱ्यांचाही छडा लावण्यात येणार असून कठोर कारवाईचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Advertisement
Tags :

.