For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिका-इराण टेन्शन कमी; पण सोन्याचे दर वाढले, जाणून घ्या आजचे दर..

12:18 PM May 06, 2026 IST | NEETA POTDAR
अमेरिका इराण टेन्शन कमी  पण सोन्याचे दर वाढले  जाणून घ्या आजचे दर
Advertisement

Advertisement

पुन्हा एकदा  सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ झालेली दिसत आहे

मागील अनेक महिन्यांपासून जग युद्धाच्या खाईत लोटलं असल्याने टंचाई आणि महागाईच्या चिंतेने सामान्यांचे आयुष्य खडतर बनले आहे. जगभरात वाढलेल्या या समस्येत भुवया उंचावणारी गोष्ट म्हणजे सोन्याच्या दरातील चढ-उतार. (GOLD Rate up and Down). सोन्याच्या वाढत्या आणि अचानक उतरत्या दरांमुळे अनेकांना विशेषत: सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

Advertisement

आता पुन्हा एकदा  सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ झालेली दिसत आहे. जागतिक पातळीवर अमेरिका-इराण यांच्यात सुरु असणारा युद्धाचा तणाव कमी होण्याची स्थिती निर्माण झाल्यामुळे सध्या सोन्याचे दर वाढले आहेत. साहजिकच सोनं स्वस्त होईल ही सामान्यांची अपेक्षा सध्या तरी हवेत विरल्याचे दिसत आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष आणि इराणसोबतच्या युद्धात केंद्रस्थानी असणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण इराणसोबत शांततेचा करार करु शकतो असा एक पुसटसा संकेत दिला. त्यामुळे जगाच्या तणावाचे कारण ठरलेली होर्मुझची सामद्रधनी (Strait of Hormuz) खुली होईल आणि व्यापाराचे मार्ग खुले होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यानिमित्ताने सोन्याचा मुद्दा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. चला पाहूया सोन्याच्या बदललेल्या दराविषयी...

मिळालेल्या माहितीनुसार Goodreturns  या विश्वासार्ह वेबसाइटच्या नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार आज सकाळी 10 वाजता राजधानी दिल्लीमध्ये सोन्याचे भाव पुढीलप्रमाणे असतील. या बदललेल्या दरात, 24 कॅरेट सोनं - 1,51,440 रुपये प्रति तोळा आणि 15,144 रुपये प्रति ग्रॅम, 22 कॅरेट सोनं - 1,38,850 रुपये प्रति तोळा आणि 13,885 रुपये प्रति ग्रॅम, 18 कॅरेट सोनं - 1,13,630 रुपये प्रति तोळा आणि 11,363 रुपये प्रति ग्रॅम

महत्वाचे मुद्दे

बदललेल्या दराचा विचार केला तर सोन्याचा भाव 2, 210 रुपये प्रति तोळा इतका वाढलेला आहे. ही वाढ मोठी समजली जाते. असे असले  तरीही आजचा सोन्याचा भाव हा आजवरच्या उच्चांकापासून प्रतितोळा तब्बल 29 हजारांनी स्वस्त आहे असेच मानावे लागेल. एका वर्षाचा भाव बघता सोनं 95, 880 रुपयांवरून आज 1.51 लाख झाले आहे. म्हणजेच वर्षभरात सोने दरात तब्बल 56 हजारांनी वाढ झाली आहे.

चांदीही महागली

Goodreturns ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रासह राजधानी दिल्लीत चांदीचा भाव प्रतिकिलो 2,65,000 रुपये इतका असणार आहे. ही चांदीच्या दरात झालेली वाढ आहे म्हणजेच आज झालेल्या वाढीमुळे प्रतिकिलो 10 हजार जादाचे मोजावे लागणार आहेत . पण चांदीचा भाव वाढला असला तरी अभ्यासकांच्या मते आजही चांदी आजवरच्या उच्चांकापासून 1.55 लाख रुपयांनी स्वस्त आहे.

Advertisement
Tags :

.