बिहारमध्ये सोने खरेदी 89 टक्क्यांनी वाढली
इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक सोने खरेदी : शेअर गुंतवणूकदारांत चारपट वाढ
मुंबई :
उत्तर प्रदेश (यूपी) मध्ये 4 वर्षात शेअर गुंतवणूकदार जवळपास साडेचार पट वाढले असून सोने खरेदीतही 89 टक्के वाढ झाली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूकही जवळपास तिप्पट झाली आहे. मध्य प्रदेश (एमपी), राजस्थान आणि बिहारमध्ये हा ट्रेंड जवळपास सारखाच आहे.
एमपीमध्ये, शेअर्समधील गुंतवणूकदार 4.75 पटीने वाढले आहेत, म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदार 3 पटीने वाढले असल्याचेही दिसून आले आहे. दागिन्यांच्या खरेदीतही 55 टक्के वाढ झाली आहे. शेअर गुंतवणूकदारांच्या संख्येत पाहता राजस्थान कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली आणि आंध्र प्रदेशनंतर चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहे.
बिहारमध्ये गुंतवणूकदार चार पटीने वाढले
याच चार वर्षात बिहारमधील शेअर गुंतवणूकदार 4 पट, म्युच्युअल फंड 3 पट आणि सोन्याची खरेदी 89 टक्क्यांनी वाढली आहे, जी इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. मात्र ही वाढही धक्कादायक आहे, कारण या राज्यांतील लोकांचे सरासरी उत्पन्न गुंतवणुकीच्या प्रमाणात कमी झाले आहे.
थिंकटँक ‘प्राइस’च्या माहितीनुसार, मागासलेली राज्ये वेगाने विकसित होत आहेत. जयपूर, कोटा, पाटणा, इंदूर, भोपाळ, लखनौ ही शहरे बूम टाउन आहेत. वार्षिक 1 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शेअर्स, म्युच्युअल फंड आणि सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
बिहारमध्ये शेअर गुंतवणूकदार वाढले
सध्या देशात म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणूक 64.68 लाख कोटी रुपये आहे. या फंडातील गुंतवणूक चार वर्षांत मध्यप्रदेशात 203 टक्के आणि यूपीमध्ये 190 टक्क्यांनी वाढली आहे. बिहारमध्ये 4 वर्षात सोन्याच्या दागिन्यांची सर्वाधिक खरेदी झाली. दक्षिणेकडील राज्येही मागे पडली. शेअर बाजारात गुंतवणुकदारांच्या संख्येच्या बाबतीत यूपीने गुजरातच्या मागे दुसरे स्थान पटकावले आहे. बिहारने पहिल्या 11 राज्यांमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर भारतीय जास्त जोखीम घेत आहेत, एफडीत गुंतवायचे पैसे शेअरबाजारात गुंतवले जात आहेत, असेही दिसून आले आहे. हे प्रमाण उत्तर भारतातील शहरांमध्ये अधिक दिसले आहे. ते अधिक जोखीम घेत आहेत. दक्षिण भारतीय राज्ये शेअर बाजारात गुंतवण्याचा धोकादायक मार्ग टाळत आहेत. त्यामुळे 4 वर्षांत गुंतवणूकदारांच्या संख्येत आणि गुंतवणुकीच्या रकमेत अनपेक्षित वाढ झाली नाही.