Gold Price : सोन्याला झळाळी सव्वा लाखाची
एका दिवसात सोने १९००, तर चांदी ३४०० ने महागली
कोल्हापूर : दसऱ्याचा सण संपताच अवघ्या एका आठवड्याच्या आतच सोने दररोजच्या वाढीने सव्वा लाखाच्या पार गेले आहे. बुधवारी १० ग्रॅम सोन्याची किंमत तब्बल ₹१,२६,२०० झाली असून, चांदीचा दरही किलोमागे ₹१,५७,६०० वर पोहोचला आहे. एका दिवसात सोन्यात ₹१,९००, तर चांदीत ₹३,४०० रुपयांची मोठी वाढ झाली आहे.
मंगळवारी सोन्याचा दर ₹१,२४,३००, तर चांदी ₹१,५४,२०० रुपये प्रति किलो होती. फक्त २४ तासांतच दोन्ही दरात लक्षणीय वाढ झाल्याने बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. सणासुदीच्या कालावधीत दर वाढणे ही नेहमीची बाब असली, तरी यंदा दरवाढ सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.आता फक्त शोरूमध्येच दागिने पाहणे पसंत करावे लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, जागतिक राजकारणातील तणाव, आणि डॉलर-रुपया दरातील चढउतार यामुळे दरवाढीला अधिक चालना मिळाली आहे.