Sangli Crime : सांगलीत वृद्ध महिलेकडून सोन्याचे दागिने हिसडा मारून चोरी
बँकेमध्ये पैसे काढण्याच्या बहाण्याने वृद्धेची फसवणूक
सांगली : संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या माधवनगर येथून एक वृध्दा घरी जात होती. तिच्याजवळ एकजण येवून त्यांने सोन्याचे दागिने काढुन आत ठेवा असे सांगितले. ती वृध्दा दागिने काढत असतानाच हिसडा मारून पळवून नेणाऱ्यास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केली आहे. अटक केलेल्या संशयिताचे नाव दस्तगीर गुलाब शेख रा. सदर बझार, शाहू, कॉलनी कोल्हापूर असे आहे.
२७ जानेवारी रोजी सकाळी वृध्दा कामावरून घरी जात असतानाच हा संशयित दस्तगीर शेख त्यांच्याजवळआला आणि त्यांने बँकेत पैसे काढण्यास जायचे आहे. गाडीवर ब-सा असे सांगितले. त्यानंतर त्यांने या वृध्देला गळ्यातील सोन्याचे दागिने काढून ठेवा असे सांगितले. या संशयिताच्या सांगण्यावरून ती वृध्दा गळ्यातील सोन्याचे दागिने काढत असतानाच त्यांने हिसडा मारून तो पळून गेला.
त्यानंतर ही माहिती या वृध्देने घरात येवून सांगितले. या वृध्देच्या नातेवाईकांनी संजयनगर पोलीसात येवून तक्रार दाखल केली. यानुसार ही व्यक्ती दस्तगीर शेख असल्याचे समोर आल्यावर त्याचा शोध सुरू केला त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता चोरीचा गुन्हा कबूल केला.