For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओम, संचिता यांना जलतरण स्पर्धेत सुवर्णपदके

10:12 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
ओम  संचिता यांना जलतरण स्पर्धेत सुवर्णपदके
Advertisement

राष्ट्रीय पॅराजलतरण स्पर्धेत केली कामगिरी

Advertisement

बेळगाव : मध्य प्रदेश येथे  झालेल्या राष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक तसेच मंड्या, म्हैसूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेत बेळगावच्या आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबचे जलतरणपटू ओम जुवळी व संचिता सातपुते यांनी 6 सुवर्ण पदके पटकावित घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत ओम जुवळीने मंड्या येथे झालेल्या राष्ट्रीय स्पेशल ओलंम्पिक मध्ये कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करताना 100 मी. बॅकस्ट्रोक, 100 मी. ब्रेस्टस्ट्रोक व 100 मी. रिले स्पर्धेत 3 सुवर्णपदके संपादन केली. संचिता सातपुतेने  मध्यप्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत 100 मी. फ्रीस्टाईल, 100 मी. बॅकस्ट्रोक व 100 मी. ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारात 3 सुवर्णपदके संपादन केली. वरील पॅरा जलतरणपटूंना एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, रणजीत पाटील, विशाल वेसणे यांचे मार्गदर्शन लाभते तर क्लबचे चेअरमन अॅड. मोहन सप्रे, अध्यक्ष शितल हुलबते, अरविंद संगोळी यांचे प्रोत्साहन लाभले

Advertisement
Advertisement
Tags :

.