For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मानसी, काजल, सुमित यांना सुवर्णपदके

06:14 AM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
मानसी  काजल  सुमित यांना सुवर्णपदके
Advertisement

वृत्तसंस्था,  दा नांग (व्हिएतनाम)

Advertisement

येथे सुरू असलेल्या 23 वर्षांखालील वयोगटाच्या आशियाई पुरूष आणि महिलांच्या कुस्ती स्पर्धेत भारताच्या मानसी लाथेर, काजल आणि सुमित यांनी सुवर्णपदकांची कमाई केली.

महिलांच्या 68 किलो वजन गटातील अंतिम लढतीत मानसीने उझ्बेकच्या फिरुजा इसेनबाएव्हाचा 14-1 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक मिळविले. महिलांच्या 76 किलो वजन गटातील अंतिम लढतीत भारताच्या काजलने किर्जीस्तानच्या अझेरा किन झेनिबेकोव्हाचा 10-0 असा एकतर्फी पराभव करत भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिली. पुरूषांच्या 63 किलो वजन गटातील ग्रिकोरोमन प्रकारात भारताच्या सुमितने उझ्बेकच्या खलीलबोएव्हचा 12-2 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक घेतले.

Advertisement

या स्पर्धेत भारताने तीन सुवर्णपदकांची कमाई केली तसेच 2 रौप्य आणि 3 कांस्यपदकेही मिळविली. महिलांच्या विभागात व्हिएतनामच्या एनगोकने अंतिम लढतीत भारताच्या स्वीटीचा 7-5 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक मिळविले. त्यामुळे स्वीटीला या वजन गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या 59 किलो वजन गटात उझ्बेकच्या सोबीरोव्हाने भारताच्या नेहाला 9-5 अशा गुणांनी हरवत सुवर्णपदक मिळविले. नेहा रौप्यपदकाची मानकरी ठरली. अहिल्या, नीरज आणि रोहीत यांनी या स्पर्धेत प्रत्येकी एक कांस्यपदक पटकाविले. कांस्यपदकासाठीच्या लढतीत अहिल्या शिंदेने किर्जीस्तानच्या केझीचा 13-2 अशा गुणांनी पराभव केला. पुरूषांच्या 55 किलो वजन गटात नीरज पटेलने ग्रीकोरोमन प्रकारात कांस्यपदक मिळविताना कझाकस्तानच्या बेकीमोव्हचा 8-0 असा एकतर्फी पराभव केला. 87 किलो वजन गटात भारताच्या रोहीत बुराने किर्जीस्थानच्या युलूचा 9-0 असा पराभव करत कांस्यपदक मिळविले.

Advertisement
Tags :

.