कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एशियन थाई बॉक्सिंग स्पर्धेत मारिया आल्मेडा हिला सुवर्णपदक

11:17 AM Nov 19, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-

Advertisement

गोवा येथे झालेल्या एशियन थाई बॉक्सिंग स्पर्धेत भारतातील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. सिंधुदुर्ग, वेंगुर्ले येथील खेळाडू कु. मारिया आल्मेडा हिने महिलांच्या खुल्या गटामध्ये उत्तराखंडची भावना निषाद हिला पराभूत करून सुवर्णपदक पटकावित भारताची मान उंचावली.सिंधुदुर्गनगरीमधील खेळाडू कु. हेरंब नारायण नार्वेकर (जि. प. पू. प्रा. शाळा ओरोस नं. 1) व कणकवली मधील खेळाडू कु. संस्कार राकेश राणे (पोदार इंटरनॅशनल स्कूल, कणकवली ) या थाई बॉक्सरनी रौप्य पदक पटकावित भारताला अजून दोन पदकांची कमाई करून देत सिंधुदुर्गाचे नाव आशियाई स्पर्धेत गाजवले.सदर खेळाडूंना प्रशिक्षक कु. चित्राक्षा मुळये व कु. मृणाल मलये यांचे मार्गदर्शन लाभले. या आशियाई स्पर्धेत भारत, भूतान, नेपाळ, कंबोडिया, श्रीलंका, व्हिएतनाम सहीत इतर देश सहभागी झाले. सिंधुदुर्ग जिल्हा (मुवथाई) थाई बॉक्सिंग असोसिएशन, सिंधुदुर्गचे अध्यक्ष लेफ्टनंट विवेक राणे व संस्थेचे विश्वस्त गौरव घोगळे यांनी सर्व खेळाडूंना बॉक्सिंग क्षेत्रातील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Advertisement

Advertisement
Next Article