Gold Price : ऐन दिवाळीत सोने महागले !
- दिवाळीदिवशीच सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ
कोल्हापूर : सोमवारी दिवाळी दिवशीच सोन्याच्या दरात १० ग्रॅममागे १७०० रूपयांची वाढ झाली आहे. रविवारी सोन्याचा दर १,३१,६०० रूपये असा होता. पण दिवाळी दिवशीच एका दिवसात सोन्याच्या दरात वाढ होऊन १,३३,३०० रूपये झाले आहे. तर दुसरीकडे मात्र चांदीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. चांदीच्या दरात किलोमागे एका दिवसात १८०० रुपयांनी कमी झाली आहे. रविवारी चांदी दर १,६८,००० रूपये असा होता. सोमवारी हाच दर १,६७,८०० रूपये असा झाला आहे.
दिवाळीदिवशीच सोन्याच्या दरात वाढ झाल्याने सोन्याचा दर चांदीसारखे वाढू शकतो. मंगळवारी लक्ष्मी-कुबेर पूजन, बुधवारी दिवाळी पाडवा तर गुरूवारी भाऊबीज आहे. या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात घसरण होण्याची कोणतीच शक्यता नसून, उलट दरात वाढ होण्याचे संकेत आहेत. शनिवारी धनत्रयोदशी चांदी दर १,९२,००० रूपयावरून १,६८,००० रूपयावर खाली आली. यामुळे किलोमागे २४ हजार रूपयानी चांदी स्वस्त झाली आहे. सोने-चांदीचा दर सापशिडी सारखा सुरू आहे.