For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गौरव फायटर्सकडे गोल्ड जिम चषक

10:45 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
गौरव फायटर्सकडे गोल्ड जिम चषक
Advertisement

बेळगाव : गोल्डजीम आयोजित फाईव्ह-ए-साईड अंतरक्लब फुटबॉल स्पर्धेत गौरव फायटर संघाने युनायटेड संघाचा पराभव करुन गोल्ड जीम चषक पटकाविला. बालिका आदर्श विद्यालय येथील टर्फ केए 22 टिळकवाडी या मैदानावर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी लिफ्टर्स पॅराडाईजचे संचालक राकेश वादवा, जीमचे संचालक मनीषकुमार यांच्या हस्ते चेंडू लाथाडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत 8 संघांना निमंत्रीत करण्यात आले होते. अंतिम सामना गौरव फायटर्स व युनायटेड संघात झाला. त्यामध्ये गौरव फायटर्स संघाने विजय संपादन केला. विजेत्या संघाला प्रमुख पाहुणे राज के. पुरोहित यांच्या हस्ते चषक, रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. यावेळी रवी बिर्जे, राहुल पोटे, आशा पोटे, अफरोज ताशिलदार, ललित शर्मा, गौरव अनगोळकर, श्रीनिवास सातारकर, आदित्य यमकनमर्डी, गणेश चव्हाण, मनोज पाटील आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.