For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साक्षी, प्रिया, अरुंधती यांना सुवर्ण

06:16 AM Aug 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
साक्षी  प्रिया  अरुंधती यांना सुवर्ण
Advertisement

वृत्तसंस्था, ग्लास्गो

Advertisement

2026च्या ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील शनिवारी दहाव्या दिवशी मुष्टियुद्ध या क्रीडा प्रकारात भारतीय स्पर्धकांनी निर्विवाद आपले वर्चस्व राखले. महिलांच्या विभागात साक्षी चौधरी, प्रिया घांघस यांनी आपल्या वजन गटातून भारताला सुवर्णपदके मिळवून दिली.

महिलांच्या 51 किलो वजन गटातील अंतिम लढतीत साक्षी चौधरीने इंग्लंडच्या रुबी व्हाईटचा 5-0 अशा गुण फरकाने एकतर्फी पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर महिलांच्या 60 किलो वजन गटात भारताच्या प्रिया घांघसने सुवर्णपदक मिळविताना अंतिम लढतीत कॅनडाच्या मारी बेथॉल अल अहमदीवर 4-1 अशा गुण फरकाने विजय मिळविला. महिलांच्या 70 किलो वजन गटातील अंतिम लढतीत भारताच्या अरुंधती चौधरीने इंग्लंडच्या चॅन्टेली रिडचा सरस गुणावर पराभव करत सुवर्णपदक पटकाविले.

Advertisement

Advertisement
Tags :

.