For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रमोद भगतला सुवर्ण, कृष्णा नागरला रौप्य

06:07 AM Jun 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रमोद भगतला सुवर्ण  कृष्णा नागरला रौप्य
Advertisement

वृत्तसंस्था/ डब्लिन

Advertisement

पॅरा बॅडमिंटन स्टार प्रमोद भगतने रविवारी येथे झालेल्या ब्रिटिश अँड आयरिश इंटरनॅशनल स्पर्धेत पुरुष एकेरी एसएल-3 प्रकारात सुवर्णपदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रभावी कामगिरी सुरू ठेवली आहे.

भारतीय खेळाडूंमधील अंतिम सामन्यात, भगतने आपलाच देशबांधव नितेश कुमारवर 44 मिनिटांत 23-21, 21-14 असा रोमांचक विजय नोंदवून विजेतेपद पटकावले. भगतने मिश्र दुहेरीत कांस्यपदकही मिळवले. मनीषा रामदाससोबत मिश्र दुहेरी एसएल-3 एसयू-5 प्रकारात पदक जिंकून, डब्लिनमधील आणखी एका यशस्वी मोहिमेची सांगता केली. टोकियो पॅरालिम्पिक चॅम्पियन कृष्णा नागरनेही या स्पर्धेत चांगली कामगिरी केली. त्याने नित्या श्रीसोबत मिश्र दुहेरी एसएच 6 प्रकारात रौप्य पदक, तर शिवराजन सोलायमलाईसोबत पुरुष दुहेरी एसएच 6 प्रकारात आणि एकेरीत कांस्य पदक पटकावले.

Advertisement

Advertisement
Tags :

.