कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोल्हापूरच्या स्वरुप उन्हाळकरला सुवर्ण

06:50 AM Mar 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खेलो इंडिया पॅरा स्पर्धा, दिल्ली 2025 : 10 मी एअर रायफल प्रकारात शेवटच्या शॉटवर गाजवले मैदान

Advertisement

वृत्तसंस्था/   नवी दिल्ली  

Advertisement

खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या नेमबाजीतील लढतीत महाराष्ट्राच्या स्वरुप उन्हाळकरने एक दशांश गुणाने सुवर्णपदकावर नाव कोरले. 10 मीटर रायफल नेमबाजीतील एस एच 1 प्रकारात स्वरूपसोबत कविन केगनाळकरने रूपेरी यश संपादन केले.

डॉ. कर्णीसिंग शूटिंग रेंजवर सुरू असलेल्या नेमबाजीत स्पर्धेतील पहिल्याच अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या डबल धमाका पहाण्यास मिळाला. 10 मीटर रायफल नेमबाजीतील एस एच 1 प्रकारात पात्रता फेरीत कोल्हापूरचा स्वरूप उन्हाळकर चौथा स्थानावर होता. अंतिम लढतीत अनुभव संपन्न स्वरूपने 16 व्या फेरीपर्यंत प्रथम स्थानावर आघाडी घेतली होती. 17 व्या फेरीत 9.1 गुणांमुळे तो चौथा स्थानावर  फेकला गेला. तर अनपेक्षितपणे चौथ्या स्थानावर असणारा 15 वर्षींय कविन केगनाळकरने पहिल्या स्थानी मुसंडी मारली. पदक निश्चित करणाऱ्या 20 व्या फेरीत स्वरूपने आपल्या लौकिकला साजेसा खेळ करीत पुन्हा आघाडी घेत दुसरे स्थान प्राप्त केले. शेवटच्या 23 व 24 फेरीत सुवर्णपदकासाठी महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकर व कविन केगनाळकरमध्ये कमालीची झुंज दिसून आली. 224.2 गुणांसह कविन आघाडीवर तर पाईंट 1 गुणांनी स्वरूप दुसऱ्या स्थानावर होता. 23 व्या फेरीत गुणांची बरोबरी करीत अखेरच्या 24 व्या फेरीत 10.7 गुणांचा अचूक वेध घेत अवघ्या एका गुणांनी स्वरुपने बाजी मारली.

स्वरुपचे सलग दुसऱ्यांदा सोनेरी यश

कोल्हापूरचा स्वरुप उन्हाळकरने सलग दुसऱ्यांदा खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदकाचा करिश्मा घडविला. पॅरीस ऑलिम्पिकपटू असणारा स्वरुप हा स्पर्धेतील प्रमुख दावेदार होता. यंदाच्या स्पर्धेत त्याने अंतिम क्षणी बाजी मारत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक मिळवण्याची किमया केली आहे.

प्रतिक्रिया

पुण्यातील बालेवाडी स्टेडियममधील कसून सरावामुळे पुन्हा यश हाती आले आहे. पॅरिसमधील अपयश मागे टाकून या पदकापासून नवी सुरुवात झाली आहे. आशियाई स्पर्धा आणि ऑलिम्पिक पदक हेच माझे स्वप्न आहे.

नेमबाज स्वरुप उन्हाळकर, सुवर्णपदक विजेता

अॅथलेटिक्समध्ये ट्रिपल धमाका

खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये अॅथलेटिक्स प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी कायम राखत पदकांची लयलूट सुरुच ठेवली आहे. भालाफेकमध्ये पॅराऑलिम्पियन भाग्यश्री जाधव, पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रणव देसाई आणि महिलांच्या थाळीफेक प्रकारात अक्कुताई उलभगत यांनी सुवर्णपदक पटकावले. लांब उडी प्रकारात ऋतुजा कवठाळेने रौप्यपदक मिळवले.

खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत सलग दुसरा दिवस महाराष्ट्रासाठी सुवर्णदिन ठरला. 37 वर्षीय भाग्यश्रीने गोळाफेकमध्ये अपेक्षेनुसार सुवर्ण जिंकले. तिने 13.57 मीटर अंतरावर गोळा फेकला. दुसरे स्थान मिळवणाऱ्या दीपिका राणीने 10.42 मीटरची कामगिरी नोंदवली. भाग्यश्री रविवारी (दि. 24) गोळाफेक प्रकारात ही सहभागी होत आहे. यातही तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.

ठाण्याच्या प्रणव देसाईने 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रतिस्पर्ध्यांना बरेच मागे टाकून वेगवान पुरुषाचा मान मिळवला. त्याने ही शर्यत 11.88 सेकंदात जिंकली. 12.51 सेकंद वेळ देत हिमाचल प्रदेशचा राजवीरसिंग दुसरा तर 12.65 सेकंद वेळेसह तमिळनाडूचा राजेशकुमार तिसरा आला. महिलांच्या थाळीफेक प्रकारात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी असलेल्या 38 वर्षीय अक्कूताईने महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. तिने 15.83 मीटर अंतरावर थाळीफेक केली. रौप्यपदक मिळवणाऱ्या छत्तीसगडच्या छोटी मेहराने 13.22 मीटर इतकी थाळी फेकली. अमरावतीच्या 25 वर्षीय भाग्यश्री कवठाळे हिने लांब उडी प्रकारात 3.84 मीटर कामगिरी नोंदवत रौप्यपदक जिंकले.

बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदकाची हुलकावणी

खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये बॅडमिंटनचा विचार करता शनिवारचा (दि. 23) दिवस महाराष्ट्रासाठी काहीसा निराशेचा ठरला. यात अंतिम फेरी गाठूनही तीन खेळाडूंना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पॅरा ऑलिम्पिक पदकविजेता सुकांत कदम याच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. पण अंतिम फेरीत त्याला तमिळनाडूच्या नवीन शिवकुमारकडून 15-21, 10-21 असा पराभव पत्करावा लागला. व्हीलचेअर गटात प्रेमकुमार आले याला उत्तर प्रदेशच्या शशांककुमारने पराभूत केले. ही लढत शशांककुमारने 21-12, 21-15 अशी जिंकली. आरती पाटीलला  मनीषा रामदास हिच्याकडून 21-5, 21-4 असा पराभव स्वीकारावा लागला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article