For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अस्मिता डे, हर्ष सिंग यांना सुवर्ण

06:58 AM Aug 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
अस्मिता डे  हर्ष सिंग यांना सुवर्ण
Glasgow: Gold medallist India's Harsh Singh poses for photographs during the presentation ceremony for the men's 60kg final judo event at the 23rd Commonwealth Games, in Glasgow, Scotland, Friday, July 31, 2026. Singh clinched a historic gold at the CWG as he became the first male judoka from the country to win the title, pulling off a win over Australia's vastly experienced Katz in the final on Friday. (PTI Photo/Ravi Choudhary) (PTI07_31_2026_000601B) *** Local Caption ***
Advertisement

राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युडोत महिला गटात प्रथमच भारताला सुवर्णपदक : 48 किलो गटात यशाला गवसणी

Advertisement

वृत्तसंस्था

ग्लासगो

Advertisement

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने अवघ्या 15 मिनिटांत 2 सुवर्णपदके जिंकली आहेत. शुक्रवारी रात्री ज्युडोपटू अस्मिता डे ने महिलांच्या 48 किलो गटात तर हर्ष सिंगने पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात ऑस्ट्रेलियाच्या जोशुआ काट्झला 10-0 ने हरवून दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. या दोन सुवर्णपदकांच्या जोरावर भारत पदक तालिकेत 8 व्या स्थानावर आहे. 5 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह एकूण 19 पदके आहेत. विशेष म्हणजे, भारताची 23 वर्षीय ज्युडोपटू अस्मिता डे ने सुवर्ण इतिहास रचला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युडो क्रीडा प्रकारात देशासाठी सुवर्ण पटकणारी अस्मिता ही पहिली भारतीय महिला ठरली आहे.

महिलांच्या 48 किलो गटात त्रिपुराची रहिवासी असणाऱ्या अस्मितासमोर कॅनडाच्या हेडीचे आव्हान होते. हेडी आणि अस्मिता यांच्यात चुरशीची लढत झाली, पण मोक्याच्या क्षणी अस्मिताने आपला खेळ उंचावत सुवर्णपदकाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, सामना सुरु असताना दोन्ही खेळाडूंची बरोबरी झाल्याने सामना गोल्डन स्कोअरमध्ये गेला. यामध्ये जो खेळाडू पहिला गुण मिळवतो, त्याला विजयी घोषित केले जाते. अस्मिताने अवघ्या काही सेकंदात गुण मिळवत विजयाला गवसणी घातली.

पुरुष गटातही सुवर्ण, हर्ष सिंगने मारली बाजी

शुक्रवारी रात्री महिला गटात अस्मिताने सुवर्ण जिंकल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच पुरुषांच्या 60 किलो गटात भारताच्या हर्ष सिंगने ऑस्ट्रेलियाच्या जोशुआ कॅट्झला 10-0 असे एकतर्फी नमवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. सुरुवातीला ऑस्ट्रेलियन जोशुआने आक्रमक सुरुवात केली होती. पण, हर्षने पिछाडीवरुन जोरदान पुनरागमन करत सुवर्णपदक जिंकले.

Advertisement
Tags :

.