For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेच्या हॉकरला सुवर्ण

06:47 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेच्या हॉकरला सुवर्ण
Advertisement

वृत्तसंस्था/पॅरिस

Advertisement

2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेचा धावपटू कोले हॉकरने पुरूषांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत नव्या ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक पटकाविले.

अमेरिकेचा 23 वर्षीय धावपटू हॉकरने 3 मिनिटे, 27.65 सेकंदाचा अवधी घेत नवा ऑलिम्पिक विक्रम नोंदविताना टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इंगेब्रिग्टनने नोंदविलेला 3 मिनिटे 28.32 सेकंदाचा विक्रम मोडीत काढला. या क्रीडा प्रकारात हॉकरने ब्रिटनच्या केअर आणि नॉर्वेच्या इंगेब्रिग्टनला मागे टाकले. या क्रीडा प्रकारात अमेरिकेच्या न्युगुसेने कास्यपदक मिळविले. इंगेब्रिग्टनला या स्पर्धेत रिकाम्या हाती रहावे लागले.

Advertisement

Advertisement
Tags :

.