Gold Silver Rate : सोने घसरले, चांदी गडगडली!
दोन दिवसांत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण
कोल्हापुर : गेल्या दोन दिवसांपासून जगभरातील बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या किमती झपाट्याने घसरत आहेत. शनिवारी रोजी आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या. शुक्रवारपासून मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी उलथापालथ झाली. विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोने आणि चांदीच्या किमती दोन दिवसात झपाट्याने घसरल्या. चांदीचे दर प्रतिकिलो १,००,००० पेक्षा जास्त रुपयांनी गडगडले असून सोने देखील प्रति१० ग्रॅम ३३,००० रुपयांपेक्षा जास्त घसरले.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) बर चांदीने इतिहासात प्रथमच ४,००,००० रुपये प्रतिकिलोचा टप्पा ओलांडला. गुरुवारी, चांदीने प्रतिकिलो ४,२०,०४८ चा विक्रमी उच्चांक गाठला, परंतु शुक्रवारी, फ्युचर्सट्रेडिंगमध्ये मोठी घसरण दिसून आली. ५ मार्च रोजी एक्सपायरी असलेली चांदीची किंमत एकाच दिवसात प्रतिकिलो १,०७,९७१ रुपयांनी कमी झाली. त्यानंतरही ही घसरण सुरूच होती. या घसरणीनंतर गुंतवणूकदारांना धक्का बसला.
सोन्यातही घसरण
एमसीएक्सवर २ एप्रिलची एक्सपायरी डेट असलेले २४ कॅरेट सोने गुरुवारी प्रति १० ग्रॅम १,८३,९६२ रुपयांबर बंद झाले. शुक्रवारी व्यवहार संपेपर्यंत ते प्रति १० ग्रॅ म १,५०,८४९ रुपयांवर घसरले होते. एका दिवसात सोने प्रति १० ग्रॅम ३३,११३ रुपयांनी घसरले. त्यानंतर सोने सर्वोच्च पातळीवरून ४२,२४७रुपयांनी घसरले आहे.