For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियात सोन्याच्या विटा

06:23 AM Aug 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियात सोन्याच्या विटा
Advertisement

‘लंकेत सोन्याच्या विटा’ असा एक वाक्प्रचार मराठी भाषेत आहे. पण आता त्यात परिवर्तन करुन ‘ऑस्ट्रेलियात सोन्याच्या विटा’ असा करावा लागेल, अशी स्थिती आहे. कारण ऑस्टेलियात ‘दी पर्थ मिंट’ या टांकसाळीत 512.2 किलोग्रॅम वजनाची सोन्याची वीट निर्माण करण्यात आली असून ती जगातील आतापर्यंतची सर्वात मोठी सोन्याची वीट आहे. अशा अनेक विटा या टांकसाळीत निर्माण करण्यात आल्या आहेत. तथापि, ही विशिष्ट वीट सर्वाधिक वजनाची आहे. ती इतकी मोठी आहे, की तिला उचलणे तर दूरच, पण अनेक माणसे एकत्र आली, तरी ती तिला हलवूही शकत नाहीत. या विक्रमी वजनाच्या सोन्याच्या विटेने आता गिनीज विक्रम पुस्तिकेच्या इन्स्टाग्राम पृष्ठावर स्थान मिळविले असून तिची कीर्ती आता जगात सर्वदूर पसरली आहे. ही वीट एका स्थानाहून अन्यत्र न्यायची असेल, तर अर्थातच क्रेनचा उपयोग करावा लागतो. इतकी मोठी सोन्याची वीट बनविण्याच्s कारण मात्र, या टांकसाळीने स्पष्ट केलेले नाही. ही वीट बनवेणे मुळीच सोपे नव्हते. तिच्या निर्मितीसाठी सोन्याचे उत्पादन करणाऱ्या अनेक ऑस्ट्रेलियन कंपन्यांनी त्यांचे योगदान दिले आहे. तसेच या विटेची निर्मिती विक्रम करण्यासाठीच केली आहे काय, असा प्रश्नही अनेकांकडून विचारण्यात येत आहे.

Advertisement

या विटेसाठी ऑस्टेलियातील सोन्याचे उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्यांनी त्यांच्या जवळ असणारे सोने दान केले आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियात असणाऱ्या सात सोनेनिर्मिती कंपन्याचे योगदान विशेष महत्वाचे मानले जात आहे. तिची निर्मिती करण्यासाठी टांकसाळीला विशेष तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागला असून अत्यंत दक्षतापूर्वक तिचे ओतकाम करावे लागले आहे. कारण इतके मेठे ओतकाम करताना भेगा पडण्याची किंवा चिरा पडण्याची शक्यता असते. अशी वीट निर्माण करण्यात केवळ मोठ्या कंपन्यांचा नव्हे, तर अनेक छोट्या कंपन्यांचा आणि तज्ञांचा आणि अभियंत्यांचा समावेश आहे. शेकडो किलो सोने वितळवून या विटेची अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्मिती करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सोने वितळवून ते एकजीव करणे हे आव्हान होते. ते यशस्वीरित्या पार झाले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.