Kolhapur gold rate | अमेरिका-इस्राईल हल्ल्यानंतर कोल्हापुरात सोने-चांदी दरात उसळी
युद्धाच्या पार्श्वभूमीवर सराफ बाजारात मोठी वाढ
कोल्हापूर -अमेरिका-इस्राईलने केलेल्या इराकवरील हल्ल्यामुळे युध्द सुरू झाले आहे. याचा परिणाम कोल्हापूरातील सोने-चांदी दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. या युध्दाचा परिणाम पेट्रोल, डिझेल व डॉलरच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर कोल्हापुरातून पर्यटन व शिक्षणासाठी गेलेले लोक दुबईमध्ये अडकले असून, ते सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.
कोल्हापुरातून निर्यात होणाऱ्या उद्योगावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शनिवारपासून अमेरिका-इस्राईलने इराकवर केलेल्या हल्ल्यामुळे युध्दाला प्रारंभ झाला आहे. याचा तत्काळ परिणाम व्यापार उद्योगावर होण्याचे चित्र स्पष्ट होत आहे. शनिवारी कोल्हापूर सराफ बाजाराला आठवडी सुट्टी होती. शुक्रवारनंतर युध्दामुळे शनिवारपासून सोने-चांदी दरात वाढ झाली आहे. रविवारी सोने १० ग्रॅममागे ११ हजारने तर चांदी किलोमागे ३१००० रूपयांनी महागली आहे.
शुक्रवारी सोने १६३८०० तर चांदी २६९००० असा दर होता. रविवारी कोल्हापूर सराफ बाजारामध्ये सोने दर १७५००० तर चांदी ३००००० रूपये झाली आहे. युध्दाच्या पार्श्वभूमीवर याच्या दरात वाढ होयणची शक्यता नाकारता येत पेट्रोल, डिझेल, डॉलर दरात वाढ होण्याची शक्यतानसल्याचे कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी सांगितले.
गेल्या कांही वर्षापासून पेट्रोल व डिझेलचा दर स्थिर आहे सद्या कोल्हापूरात पेट्रोल १०४.७३ तर डिझेल ९१.२७ प्रति लिटर असा दर आहे. युध्दामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता नाही. यामुळे सोशल मिडियावर युध्दामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढणार असल्याचे झळकत आहे. पेट्रोल १३० तर डिझेल शंभरच्या पुढे जाईल असे सांगितले जाते. डॉलरच्या दरात आणखी वाढ झाल्यास याचा परिणाम इंधनावर होणार आहे.
याचबरोबर कोल्हापूरातून उद्योगामधून होणाऱ्या निर्यात पार्टस्वर ही परिणाम होणार आहे. याबाबत कोल्हापूर पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे सचिव कुशाल पटेल यांनी याबांबत सांगितले की, अजून ही सरकार वा शिखर संघटनेकडून काही निर्णय झालेले नसल्याची सांगितले