For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सोने-चांदी दरात दिवाळीपूर्वी घसरण

06:45 AM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
सोने चांदी दरात दिवाळीपूर्वी घसरण
Advertisement

सोन्याचा भाव 2,282 ने घसरून प्रतितोळा 1.38 लाखांवर : चांदीचा भाव 1,264 ने घसरून प्रतिकिलो 1.80 लाखांवर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑक्टोबर महिन्यापासून सोने-चांदीचे भाव घसरत चालले असून आता दिवाळीपूर्वीही सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 10 ग्रॅम 24-कॅरेट सोन्याचा भाव सोमवारी प्रतितोळा 2,282 रुपयांनी घसरून जवळपास 1.38 लाखांवर आला. तसेच चांदीचा भावही 1,264 रुपयांनी घसरून 1.80 लाख रुपये प्रतिकिलोपर्यंत घसरला. यापूर्वी शुक्रवारी सोन्याचा भाव 1.40 लाख प्रतितोळा आणि चांदीचा भाव 1.81 लाख प्रतिकिलो होता. स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या शहरांमध्ये हा दर भिन्न असू शकतो. ऑक्टोबर महिन्यात सोन्याच्या दरात प्रतितोळा 8,084 आणि चांदीच्या दरात प्रतिकिलो 39,485 रुपयांची घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाल्यामुळे सोने-चांदीच्या दरात घट झाल्याचा दावा केला जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.