For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Gokul Milk Union | गोकुळची अर्थवाहिनी आता 'प्रशासक' चालवणार; मंत्रालयातील हालचालींनी राजकीय गोटात खळबळ!

12:47 PM Apr 30, 2026 IST | NEETA POTDAR
gokul milk union   गोकुळची अर्थवाहिनी आता  प्रशासक  चालवणार  मंत्रालयातील हालचालींनी राजकीय गोटात खळबळ
Advertisement

                                         दोन दिवसांत 'गोकुळ'चा ताबा प्रशासकांकडे;

Advertisement

कोल्हापूर -कोल्हापूर जिल्हयाची अर्थवाहिनी असलेल्या गोकुळ दूध संघाबर त्रिसदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त होणार असून येत्या दोन दिवसात त्याचे अध्यादेश काढण्यात येणार आहे. बुधवारी यासंदर्भात मंत्रालयात वेगवान घडामोडी घडल्या. नियुक्तीची फाईल पुढे सरकवण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत. तथापि नियुक्त अधिकाऱ्यांच्या नावाबाबत मात्र कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.

गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत येत्या ४ मे रोजी संपत आहे. सहकार कायद्यातील नव्या बदलानुसार अ वर्ग संस्थाच्यासंचालक मंडळाचा कार्यकाल संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रशासकाकडे कार्यभार सोपवण्याचा निर्णय झाला आहे. त्याची सुरूवात यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नियुक्तीने झाली. या निर्णयाप्रमाणे गोकूळ दूध संघावरही ५ मे पासून प्रशासक राजवटीस प्रारंभ होणार आहे.

Advertisement

निकालावरच निवडणूक कार्यक्रम अवलंबून
जिल्ह्यात १३२० संस्था नव्याने स्थापन झाल्या होत्या. त्यातील ११०८ संस्था अवसायानात काढण्याचा निर्णय झाला होता, यावरून या संस्थाचालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्याची अंतिम सुनावणी सर्किट बेंचमध्ये सुरू आहे. या संस्थाच्या निकालावरच निवडणूक कार्यक्रम कधी घोषित होणार ते ठरणार आहे.

प्रशासक नियुक्ती करावीच लागेल
दूध संघावर प्रशासक नियुक्ती नको म्हणून राष्ट्रवादी आणि शिवसेना आग्रही होती. मात्र, एकट्यासाठी वेगळा न्याय देऊ शकत नाही, असे सांगताना सरकार निवडणूक घेण्याच्याच बाजूने आहे, पण मुदत संपण्यासाठी राहिलेला कमी अवधी पाहता न्यायालयात गेलेल्या संस्थाचा निकाल लागेपर्यंत
प्रशासक नियुक्ती करावीच लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

शासकीय प्रशासक
प्रशासक गोकुळवर येणार पण ते शासकीय की अशासकीय असणार याबाबत बरीच उत्सुकता होती. आता पहिल्या टप्यात तर शासकीय प्रशासक राहणार आहे.

Advertisement
Tags :

.