For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोकुळाष्टमीला श्री विठ्ठलाचे सुवर्ण अलंकारांनी मनोहारी रूप; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

06:27 PM Sep 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोकुळाष्टमीला श्री विठ्ठलाचे सुवर्ण अलंकारांनी मनोहारी रूप  दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
Advertisement

पंढरपूर / संतोष रणदिवे : गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठलाला आकर्षक व पारंपरिक सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. विविध मौल्यवान अलंकारांनी नटलेले श्री विठ्ठलाचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

Advertisement

गोकुळाष्टमीच्या पावन पर्वानिमित्त श्री विठ्ठलाला सोन्याचा मुकुट, कौस्तुभ मणी, दंडपेठ्या जोड मोठा, हिऱ्याची कंगनजोड, दहा लोकांचा शिरपेच, मोत्याचा तुरा, नाम निळाचा, एकपदरी व दोनपदरी मोत्यांच्या कंठ्या, बाजीराव कंठी, तोडे जोड, मोहरांची माळ, एकपदरी तुळशीची माळ, इमिटेशन नेकलेस, मस्त्य जोड आदी पारंपरिक व मौल्यवान अलंकार परिधान करण्यात आले.

सुवर्ण अलंकारांनी सजलेले श्री विठ्ठलाचे मनोहारी रूप भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने मंदिरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, भाविकांनी मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले.

Advertisement

Advertisement
Tags :

.