कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Gokul Kolhapur News: गोकुळमार्फत 'गोकुळ श्री' स्पर्धेचे आयोजन

04:30 PM Oct 25, 2025 IST | NEETA POTDAR
Gokul Milk Association Kolhapur organizes Gokul Shri competition
Advertisement

सहभागी होण्याचे आवाहन - चेअरमन नविद मुश्रीफ 

Advertisement

कोल्हापूर: जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. (गोकुळ) यांच्यावतीने यावर्षीसी 'गोकुळ श्री' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून गोकुळ संलग्न सर्व दूध उत्पादकांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले आहे. 

Advertisement

दुध उत्पादन वाढीस प्रोत्साहन देणे व उत्पादकांचा सन्मान करणे, हा उद्देश ठेवून गोकुळ दूध संघ दरवर्षी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी व म्लेशींसाठी ही प्रतिष्ठेची स्पर्धा आयोजित करती यावर्षीची 'गोकुळ श्री स्पर्धा २० ते २९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत कोणत्याही दिवशी घेण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक दूध उत्पादकांनी आपल्या संस्थेच्या लेटरहेडवर चेअरमन, सचिव यांच्या सही आणि शिक्क्यानिशी अर्ज ८ नोव्हेंबरपर्यंत संपाच्या बोरवहे लिंगनूर, तावरेवाडी, गोगवे शिरोळ व ताराबाई पार्क येथील कार्यालयात नोंदणी करावी.

सहभागी होणाऱ्या म्हैशीने किमान १२ लिटर व गायीने किमान २0लिटर प्रतिदिन दूध देणे आवश्यक आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना म्हैस एक ते तीन क्रमांक व गाय एक ते तीन क्रमांक अशा सहा क्रमांकांना चलीस, शिल्ड व प्रमाणपत्र देऊन 'गोकूळ श्री' या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेतीत विजेत्यांना ३५ ते २० हजारांपर्यंत रोख बक्षीसाची रक्कम दिली जाणार आहे.

स्पर्धेबाबतच्या नियम व अटींची सविस्तर माहिती प्राथमिक दूध संस्थांना स्वतंत्र परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. या उपक्रमाद्वारे गोकुळ संघ दूध उत्पादकांना अधिक उत्पादनासाठी प्रेरित करीत असून उत्पादकांचा सन्मान करण्याची परंपरा जपली जात आहे. जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादकांनी 'गोकुळ श्री" स्पर्धेत उत्साहाने साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन 'गोकुळ'चे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले आहे. 

 

Advertisement
Tags :
@KOLHAPUR_NEWS# tbdkolhapur##tarunbharat##tarunbharatnews#gokul#Gokul milk#gokul shirgaon#gokul_news#gokul2021#MILK#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediacompititionkolhapur
Next Article