कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Gokul Sabha 2025: गोकुळ संचालक संख्या वाढीस मंजुरी, संख्या 21 वरुन 25 होणार

11:38 AM Sep 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गतवर्षीच्या तुलनेत वार्षिक उलाढालीमध्ये २९६ कोटींनी वाढ झाली आहे

Advertisement

कोल्हापूर : गोकुळच्या संचालक मंडळाची संख्या 21 वरून 25 होणार आहे. मंगळवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संचालक संख्या वाढीच्या पोटनियम दुरुस्तीला मंजुरी दिली. तर संचालिका शौमिका महाडिक यांनी पोटनियम दुरुस्तीस विरोध दर्शवत ही दुरुस्ती रेटून मंजूर केल्याचा आरोप केला.

Advertisement

त्यांच्या विरोधाची नोंद घेऊ, असे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले. वासाच्या दूध दर खरेदीमध्ये दुप्पट वाढ केल्याची घोषणा चेअरमन मुश्रीफ यांनी यावेळी केली. गोकुळची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी झाली. गोकुळच्या कागल पंचतारांकित वसाहत येथील महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना परिसरात झालेल्या समेत चेअरमन नविद मुश्रीफ अध्यक्षस्थानी होते.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील प्रमुख उपस्थित होते. तर माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार संजय घाटगे, अर्जुन आबिटकर, प्रताप माने उपस्थित होते. अहवाल वाचन करताना नविद मुश्रीफ यांनी संघाच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, गतवर्षीच्या तुलनेत वार्षिक उलाढालीमध्ये २९६ कोटींनी वाढ झाली आहे.

राखीव निधीमध्येही अहवाल सालात १०६.८२ कोटींनी वाढ झाली. गाय व म्हैस दूध खरेदी दर राज्यामध्ये सर्वाधिक गोकुळचा आहे. संघाचा ढोबळ नफाही वाढला असून गतवर्षी असणारा २०९ कोटी रुपयांचा ढोबळ नफा यंदा २१५ कोटींवर गेल्याचे सांगितले.

१३६ कोटी रुपये विधाळी पूर्वी देणार

अंतिम दूध दर फरक मौस दुधासाठी प्रतिलिटर २.४५ व गाय दुधासाठी प्रतिलिटर १.४५ रुपये देण्यात येणार आहे. हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त दूध उत्पादकांना ज्यादा २९ पैसे दूध फरक दिला जाणार आहे. तसेच दूध संस्थांसाठी गाय व म्हैस दुधावर सरासरी १.२५ रुपये डिबेंचर्स स्वरुपात देणार आहे. असे एकूण १३६ कोटी रुपये दूध उत्पादकांना दिवाळी पूर्वी देणार असल्याचे चेअरमन मुश्रीफ यांनी सांगितले.

जिल्हा बँकेने १० हजार अनुदान द्यावे

जातीवंत म्हैस सखरेदीसाठी गोकुळकडून दूध उत्पादकांना ४५ हजार रुपये अनुदान दिले जाते. तर गोकुळच्या केलें व गडहिंग्लज येथील म्हैस विक्री केंद्रावरुन म्हैस खरेदी केल्यास ४० हजार रुपये अनुदान दिले जाते. म्हैस खरेदीसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती गोकुळ संचालक संख्या वाढीस मंजुरी बॅंक अर्थसहाय्य करते. त्यांनी आता म्हैस खरेदीसाठी दूष उत्पादक शेतकऱ्यांना १० हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी चेअरमन मुश्रीफ यांनी केली.

शौमिका महाडिक सभासदांमध्ये

गोकुळचा चेअरमन महायुतीचा असल्याने संचालिका शौमिका महाडिक यांनी व्यासपीठावर यावे, अशी विनंती करण्यात अग्ली होती. मात्र महाडिक व्यासपीठावर न जाता त्या समासदांमध्येच बसून राहिल्या. आयत्यावेळी आलेल्या विषयांना मंजुरी सभेमध्ये प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत बटर मेकिंग मशिन व पेढा प्रोजेक्टसाठी आरबीएल बँकेकडून घेतलेल्या कर्जास मंजुरी मिळणे, दूध उत्पादकांना फर्टिमिन प्लस अनुदान, मोफत व सवलतीच्या दरात देण्यात आले आहे. त्यास मंजुरी मिळणे. मुंबई व पुणे येथे जागा सारेदी करणे आदी विषय आयत्यावेळी आले. या विषयांना समेमध्ये मंजुरी देण्यात आली.

नेत्यांचे मानले आभार

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, खासदार शाहू छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार वैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार राजेश पाटील यांचे गेोकुळला वेळोवेळी सहकार्य मिळाल्याबद्दल चेअरमन मुश्रीफ यांनी त्यांचे समेमध्ये आभार मानले. यावेळी त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांचे नाव घेतले नाही.

प्रश्नोत्तरा दरम्यान सभेत गोंधळ

सभा सुरुवातीच्या टप्प्यात शांततेत सुरु होती. चेअरमन मुश्रीफ यांचे प्रास्ताविक सर्वांनी शांतपणे सुमारे तासभर ऐकून घेतले. मात्र पोटनियम दुरुस्तीनंतर संचालिका शौमिका महाडिक व्यासपीठासमोर आल्या. त्यांनी दुरुस्तीस विरोध केला. यादरम्यान कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी प्रश्नोतरे सुरु केली.

यावेळी मंत्री मुश्रीफ आणि महाडिक गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. यामुळे समेत काहीकाळ गोंधळ झाला. जय भवानी, जय शिवाजी अन्जय श्रीराम संचालक वाढीच्या पोटनियम दुरुस्तीनंतर संचालिका शौमिका महाडिक व्यासपीठासमोर आल्या. त्यांनी या पोटनियम दुरुस्तीला विरोध केला. यावेळी मंत्री मुश्रीफ व आमदार पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी नविद मुश्रीफ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.

यावर महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या. यावर पुन्हा मंत्री मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी जय भवानी, जय शिवाजी अन् जय श्रीराम अशा घोषणा दिल्या. दोन्ही बाजूने सुरु झालेल्या या घोषणाबाजीमुळे सभेमध्ये काहीकाळ गोंधळ निर्माण झाला

गोकुळ भविष्यात राबविणार असलेल्या योजना :

आईस्क्रीम, चीज उत्पादन करणार

गोकुळच्या दुग्धजन्य पदार्थांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. आता आईस्क्रीम व चीज उत्पादन करण्याबाबतही संचालक मंडळाच्या बैठकीत ठरले आहे. लवकरच बाजारपेठेत गोकुळचे आईस्क्रीम व चीज विक्रीसाठी उपलब्ध होईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
@kolhapur@KOLHAPUR_NEWS#Gokul milk#hasan mushrif#KDCC_Bank#satej patil#ShoumikaMahadik#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediagokul newsGokul Sabha 2025navid mushrif
Next Article