For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

गोकुळच्या अध्यक्षपदी शशिकांत पाटील-चुयेकर यांची निवड निश्चित; 29 ऑक्टोबरला अधिकृत घोषणा

01:13 PM Oct 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोकुळच्या अध्यक्षपदी शशिकांत पाटील चुयेकर यांची निवड निश्चित  29 ऑक्टोबरला अधिकृत घोषणा
Advertisement
कोल्हापूर | प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव निश्चित मानले जात आहे. गुरुवारी, 29 ऑक्टोबर रोजी गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडणार असून, यासाठी संचालक मंडळाची पहिली बैठक दुपारी एक वाजता गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे.

गोकुळच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने महायुतीच्या ताब्यात असलेली सत्ता मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले. या आघाडीने 13 जागांवर विजय मिळवून गोकुळमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे आता अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले होते.

Advertisement

सतेज पाटील यांनी आधीच केले होते नाव जाहीर

गोकुळच्या निवडणूक प्रचारादरम्यानच आमदार सतेज पाटील यांनी समविचारी आघाडीची सत्ता आल्यास शशिकांत पाटील-चुयेकर हे अध्यक्षपदाचे उमेदवार असतील, असे स्पष्ट केले होते. त्याचवेळी त्यांनी महायुतीनेही आपल्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करावे, असे आव्हान दिले होते.

निवडणुकीत समविचारी आघाडीला 13 जागांसह स्पष्ट बहुमत मिळाल्याने चुयेकर यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

Advertisement

29 ऑक्टोबरला संचालक मंडळाची बैठक

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गोकुळ प्रशासनाने अध्यक्षपदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक बोलावण्यासंदर्भात सहकार विभागाला पत्र दिले होते. त्यानुसार गुरुवारी, 29 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात संचालक मंडळाची पहिली बैठक होणार आहे.

या बैठकीत अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. शशिकांत पाटील-चुयेकर यांची निवड अधिकृतरीत्या जाहीर झाल्यानंतर गोकुळच्या नव्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल.

गोकुळच्या सत्तांतरानंतर आता अध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, 29 ऑक्टोबरच्या बैठकीत या प्रक्रियेचा अंतिम निर्णय स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Tags :

.