For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Politics | गोकुळवर आता 'प्रशासक राज'! सर्किट बेंचच्या निकालानंतर जिल्ह्याचं राजकारण तापलं

12:58 PM May 03, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur politics   गोकुळवर आता  प्रशासक राज   सर्किट बेंचच्या निकालानंतर जिल्ह्याचं राजकारण तापलं
Advertisement

                                       गोकुळ निवडणुका लांबणीवर

Advertisement

कोल्हापुर - गोकुळमधील अवसायनातील संस्थांचा निकाल देऊन सर्किट बेंचने प्रशासक राजवटीचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत, महायुतीमधलेच नेते परस्परांना भिडले आहेत. हे प्रकरण आता थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचले आहे. युतीमध्ये अंतर्गत कलहाने टोक गाठले असताना आतापर्यंत दोस्ताना असलेल्या नेत्यांनीही एकमेकांना - डिवचल्याने वेगळ्याच संघर्षाचे वारे - बाहताना दिसत आहे. सोमवार, दि. ४ रोजी विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपत असल्याने मंगळवार, दि.५ मे पासून गोकुळवर प्रशासक येणार आहे. प्रशासक नेमणुकीचे अधिकार राज्य सरकारच्या हातात असल्याने सर्वांच्या नजरा मंत्रालयाकडे लागल्या आहेत. किती सदस्यीय आणि कोणाची नियुक्ती होणार एवढीच औपचारिकता बाकी राहिली आहे.

प्रशासकीय हालचाली गतिमान झाल्या असताना यानिमित्ताने गोकुळच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. आरोप प्रत्यारोपांच्या धुरळ्याने जणू आताच निवडणूक लागली आहे की काय असे बातावरण आहे.सर्किट बेंचमध्ये झालेल्या सुनावणीत १३२० संस्थांच्या चौकशीसाठी ८० दिवसांचा अवधी दिला आहे. चौकशी पूर्ण होऊन निकाल दिल्याशिवाय निवडणूक लावता येणार नसल्याने किमान सहा महिन्यांपर्यंत निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. पण प्रशासक आणण्यासाठी ज्या पध्दतीने पडद्यामागून सुत्रे हालली, अदृश्य शक्ती सक्रीय झाली ते पाहता गोकुळच्या हंडीसाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी ठेवली गेली आहे. गोकुळची
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादकसत्ता मिळवणे एवढे टार्गेट ठेऊन राजकीय खेळी सुरू झाल्या आहेत.

Advertisement

काही मतमतांतरे पण आम्ही शत्रू नाही

गोकुळवर प्रशासक येणे ही कायदेशीर औपचारिक बाब आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार, महायुती म्हणूनच काम करायचे आहे. आमच्यात काही मतमतांतरे आहेत, पण आम्ही एकमेकांचे शत्रू नाही, काहींना चांगल्या पध्दतीने सूचना देणे अपेक्षित आहे त्या दिल्या जातील, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट

 शिल्पकारवरून सतेज पाटील यांनी मुश्रीफांना डिवचले.

गोकुळमध्ये महायुतीचेच पॅनेल असेल, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी गेल्या सहा महिन्यांत १२ हजार वेळा म्हटले असेल, त्यांनी इतका महायुतीचा इतका ध्यास घेतला आहे की आपणच महायुतीचे शिल्पकार आहोत असे त्यांना वाटू लागले आहे, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी मुश्रीफ यांना डिवचले. याला प्रत्युत्तर देताना मुश्रीफ यांनीही १२ का १३ हजार वेळा मी म्हणालो आहे की मी महायुतीचा घटक आहे, मंत्री आहे. कोण काय बोलतंय ते मला माहित नाही, आता कांही बोलणार नाही पण निकालादिवशीच त्याचे उत्तर देईन.

Advertisement
Tags :

.