For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

गोकुळच्या सुमारे 350 कर्मचाऱ्यांना नोटिसा; प्रशासक प्रदीप मालगावे यांनी मागवला खुलासा

12:42 PM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोकुळच्या सुमारे 350 कर्मचाऱ्यांना नोटिसा  प्रशासक प्रदीप मालगावे यांनी मागवला खुलासा
Advertisement
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या सुमारे 350 कर्मचाऱ्यांना प्रशासक प्रदीप मालगावे यांनी नोटिसा बजावल्या आहेत. गोकुळच्या निवडणुकीच्या काळात संबंधित कर्मचारी कार्यालयात गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच रजेचा अर्ज सादर न करता अनुपस्थित राहिल्याप्रकरणी प्रशासनाने ही कारवाई केली असून, संबंधित कर्मचाऱ्यांकडून खुलासा मागवण्यात आला आहे.

गोकुळच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना 1 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत सुमारे 350 कर्मचारी कामावर उपस्थित नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. या कर्मचाऱ्यांनी गैरहजेरीबाबत कार्यालयाला पूर्वकल्पना दिली नव्हती किंवा रजेचे अर्जही सादर केले नव्हते, असा ठपका ठेवण्यात आला आहे.

Advertisement

गैरहजेरीची प्रशासनाकडून गंभीर दखल

कर्मचाऱ्यांच्या या गैरहजेरीची गंभीर दखल घेत प्रशासक प्रदीप मालगावे यांनी संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. गैरहजर राहण्यामागील कारण स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले असून, कर्मचाऱ्यांच्या खुलाशानंतर पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांच्या खुलाशाकडे लक्ष

एकाच वेळी सुमारे 350 कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्याने गोकुळच्या कर्मचारीवर्गात चर्चा सुरू झाली आहे. आता संबंधित कर्मचारी प्रशासनाला काय स्पष्टीकरण देतात आणि त्यानंतर प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.