महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोकुळ देशातील आदर्श सहकारी संस्था; विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम यांचे गौरवोद्गार

10:22 AM Jul 17, 2024 IST | Abhijeet Khandekar
Gokul co-operative society Divisional Co-Registrar Dr. Mahesh Kadam
Advertisement

गोकुळमध्ये चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते सत्कार

कोल्हापूर प्रतिनिधी

आदर्श व्यवस्थापन आणि उत्तम गुणवत्ता म्हणजे गोकुळ अशी गोकुळची ओळख देशभरात निर्माण झाली आहे. त्यामुळे गोकुळ देशभरातील आदर्श सहकारी संस्था असल्याचे गौरवोद्गार विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. महेश कदम यांनी काढले.
गोकुळच्या गोकुळ शिरगांव येथील प्रधान कार्यालयामध्ये विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल डॉ. महेश कदम यांचा चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. कदम बोलत होते.

Advertisement

याप्रसंगी बोलताना डॉ. कदम म्हणाले, गोकुळमधील दूध उत्पादक, ग्राहक, वितरक, कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यामध्ये असलेल्या उत्तम समन्वयामुळे गोकुळ प्रगती पथावर आहे. सहकारातील अग्रगण्य संस्था असलेल्या गोकुळने उत्तरोत्तर उत्कर्षाचे नवनवीन मानदंड प्रस्थापित करावेत अशी अपेक्षा यावेळी डॉ. कदम यांनी व्यक्त केली.

Advertisement

चेअरमन डोंगळे म्हणाले, दूध उत्पादक शेतकरी, ग्राहक यांचे हित व सहकारातील मार्गदर्शक तत्वांची जपणूक करत गोकुळची वाटचाल चालू आहे. डॉ.महेश कदम यांनी गोकुळ दूध संघास शासन स्तरावर सर्वोतपरी मदत व मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, शौमिका महाडिक, अंजना रेडेकर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले आदी उपस्थित होते.

Advertisement
Next Article