महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘गोकुळ‘चा राज्यातील पहिला आर्युवेदीक पशूऔषध प्रकल्प; अरुण डोंगळे यांची माहिती

07:01 PM Jul 20, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

उद्या उद्घाटन; औषधीमुक्त दुधासह जनावरांच्या आजारांच्या खर्चात मोठी कपात

कोल्हापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील एकमेव व देशातील तिसरा गोकुळ हर्बल पशुपूरक प्रकल्प (आर्युवेदीक पशू औषध प्रकल्प) कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे सुरू करण्यात येत आहे. गडमुडशिंगी येथे या प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थित होणार असल्याची माहिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Advertisement

अरुण डोंगळे म्हणाले, एक कोटी 26 लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पात नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, आणंद (एन.डी.डी.बी) यांचे 30 टक्के अनुदान असून उर्वरित हिस्सा संघाचा आहे. प्रकल्पाची उत्पादन क्षमता प्रतिदिन 400 किलो इतकी असून पहिल्या टप्प्यामध्ये या प्रकल्पामधून सहा प्रकारच्या हर्बल पशुपूरक (हर्बल औषधे) उत्पादनांची निर्मिती होणार आहे. उत्पादित होण्राया हर्बल पशुपूरकांचा वापर संघाच्या सर्व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत दूध उत्पादकांच्या जनावरांच्या विविध आजारांचा प्रतिबंध व उपचारांसाठी होईल.
जनावरांच्या स्तनदाह, कासेला सूज येणे, सडाला चिराभेगा, चामखिळ, अपचन, गाभण न राहणे, माजावर न येणे, ताप येणे, लाळ खुरकत, लम्पी, सांधे सूज, खोकला, विषबाधा, गोचीड, जनावरास उठता न येणे अशा विविध आजारावर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचार करणे सहज सुलभ होणार असल्याचे डॉ.विजय मगरे यांनी सांगितले.

Advertisement

गोकुळ ने सर्वसामान्य दूध उत्पादक केंद्र बिंदू मानून त्यांच्या उत्कर्षासाठी व किफायतशीर दूध व्यवसायासाठी सातत्याने विविध प्रशिक्षण कार्यक्रम, योजना व सेवासुविधा प्रभावीपणे राबविण्यात येतात. तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांच्यासाठी 24 x 7 पशुवैद्यकीय सेवा पुरविली जाते. संघाने स्तनदाह (मस्टायटीस) प्रतिबंध कार्यक्रम अंतर्गत सन एप्रिल 2017 ते मार्च 2024 अखेर सर्व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत एकूण 55 हजार इतक्या जनावरांना फक्त आयुर्वेदिक उपचार केले असून त्यापैकी 41 हजार जनावरे म्हणजे 75टक्के बरी झाली आहेत. आर्युवेदीक उपचार पध्दतीचा लाभ दुध उत्पादप शेतक्रयांना होईल.- अरुण डोंगळे ( चेअरमन-गोकुळ)

औषधांचा फायदा
1. पारंपारिक घरगुती औषधोपचार पद्धतीला चालना
2. इतर औषधांच्या तुलनेत किमान 60 टक्के बचत.
3. अॅलोपॅथिक औषधाच्या अति वापरामुळे होणारे दुष्परिणाम कमी करणे.
4. स्वच्छ आणि प्रतिजैवक (अँटिबायोटिक)अंश विरहित दूध उत्पादन
5. अॅलोपॅथिक औषधाचा कमी खर्च .
6. नैसर्गिक औषधांमुळे जनावरांच्या शरीरावर परिणाम नाही.
8. औषधांमुळे जनावरांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत.

Advertisement
Tags :
Arun DongaleAyurvedic Animal Medicine ProjectgokulHerbal Animal Supplement Project
Next Article