गोकुळचा निकाल लागताच अध्यक्ष ठरला! सतेज पाटील शब्द पाळणार, शशिकांत पाटील चुयेकर यांना संधी मिळणार?
गोकुळचे संस्थापक सदस्य आनंदराव पाटील चुयेकर यांचे पुत्र असलेल्या शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव त्यामुळे अध्यक्षपदासाठी चर्चेत आले आहे. निवडणूक प्रचारात समविचारी आघाडीची सत्ता आल्यास त्यांना अध्यक्षपदाची संधी देण्यात येईल, असे सतेज पाटील यांनी जाहीर केले होते.
संस्थापक सदस्यांच्या कुटुंबाला संधी मिळण्याची शक्यता
गोकुळ दूध संघाच्या स्थापनेत आनंदराव पाटील चुयेकर यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. त्यांच्या कुटुंबातील शशिकांत पाटील चुयेकर यांना अध्यक्षपद देण्याच्या घोषणेमुळे या निवडणुकीनंतर त्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.
समविचारी आघाडीने बहुमताचा आकडा गाठल्याने अध्यक्षपदाच्या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, अध्यक्षपदाबाबतचा अंतिम निर्णय अधिकृत प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. गोकुळच्या नव्या नेतृत्वाकडून दूध उत्पादकांच्या प्रश्नांवर कोणती पावले उचलली जातात, याकडेही सर्वांचे लक्ष असेल.
