For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

गोकुळ सत्तास्थापनेच्या वादात सतेज पाटलांना मोठा दिलासा; अध्यादेशाला माजी सरन्यायाधीशांचा कायदेशीर आक्षेप

07:32 PM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोकुळ सत्तास्थापनेच्या वादात सतेज पाटलांना मोठा दिलासा  अध्यादेशाला माजी सरन्यायाधीशांचा कायदेशीर आक्षेप
Advertisement
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या सत्तास्थापनेवरून सुरू असलेल्या राजकीय आणि कायदेशीर संघर्षात सतेज पाटील यांच्या गटाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवनिर्वाचित बहुमताच्या संचालकांना सत्तास्थापनेपासून रोखण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढून तज्ज्ञ आणि शासकीय स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्यास, असा निर्णय कायदा आणि संविधानाच्या चौकटीत टिकणार नाही, असा कायदेशीर अभिप्राय भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.

गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा अभिप्राय महत्त्वाचा मानला जात आहे. बहुमताच्या निर्वाचित संचालकांना सत्तास्थापनेपासून दूर ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून संभाव्य अध्यादेश आणण्याच्या चर्चेदरम्यान हा कायदेशीर सल्ला देण्यात आला आहे.

Advertisement

अध्यादेश म्हणजे अधिकारांचा गैरवापर ठरेल?

माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या कायदेशीर अभिप्रायात अशा प्रकारचा अध्यादेश आणणे मनमानी कारभार आणि अधिकारांचा गैरवापर ठरू शकते, असे नमूद केल्याचे सांगण्यात येत आहे.

गोकुळच्या नवनिर्वाचित बहुमताला सत्तास्थापनेपासून रोखण्यासाठी तज्ज्ञ आणि शासकीय स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रयत्न झाल्यास, तो कायदा आणि संविधानाच्या कसोटीवर टिकणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडल्याचे वृत्त आहे.

Advertisement

या अभिप्रायामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुमताच्या संचालकांना रोखण्यासाठी अध्यादेशाचा पर्याय वापरण्याबाबत कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात.

13 बहुमताच्या संचालकांच्या वतीने मागवला होता अभिप्राय

गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमधील वकील अॅड. श्रीकृष्ण गणबावले यांनी गोकुळच्या 13 बहुमतातील निर्वाचित संचालकांच्या वतीने माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्याकडून कायदेशीर सल्ला मागवला होता.

या मागणीवर भूषण गवई यांनी 3 नोव्हेंबर 2026 रोजी आपला अभिप्राय दिला. या अभिप्रायात संभाव्य अध्यादेशाच्या कायदेशीर वैधतेबाबत गंभीर निरीक्षणे नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

गोकुळच्या सत्तासंघर्षात कायदेशीर अभिप्रायाला महत्त्व

गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुमताच्या संचालकांच्या सत्तास्थापनेचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर माजी सरन्यायाधीशांचा कायदेशीर अभिप्राय सतेज पाटील यांच्या गटासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

राज्य सरकारकडून अध्यादेश आणण्याचा पर्याय वापरला गेल्यास त्याला न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, हा अभिप्राय म्हणजे न्यायालयाचा अंतिम निर्णय नसून कायदेशीर सल्ला आहे. त्यामुळे गोकुळच्या सत्तास्थापनेचा अंतिम मार्ग काय ठरणार, याकडे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.