For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्रिपदासाठी परमेश्वरांचे नाव?

12:33 AM Dec 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
मुख्यमंत्रिपदासाठी परमेश्वरांचे नाव
Advertisement

सिद्धरामय्यांचा गट नवीन राजकीय फासे टाकण्याच्या तयारीत : डी. के. शिवकुमारांना चेकमेट देण्यासाठी रणनीती

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी झालेल्या डिनर राजकारणानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा गट नवीन राजकीय फासे टाकण्याच्या तयारीत आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत अडीच वर्षानंतर सत्तावाटपाचा कोणताही निर्णय झालेला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले असून हायकमांडच्या पाठिंब्याने पुढे जाण्याचा त्यांना विश्वास आहे. जर नेतृत्व बदल अपरिहार्य असेल तर सिद्धरामय्या गटाने डी. के. शिवकुमार यांना चेकमेट देण्यासाठी ज्येष्ठ नेते डॉ. जी. परमेश्वर यांचे नाव पुढे आणण्याची रणनीती आखली आहे, असे समजते. स्वच्छ प्रतिमा आणि ज्येष्ठतेचे कार्ड वापरून परमेश्वरांना मुख्यमंत्रिपदावर बसवण्याचा विचार सिद्धरामय्यांचा गट करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Advertisement

डॉ. जी. परमेश्वर यांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी एआयसीसीचे प्रधान सचिव (संघटन) के. सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली आहे. या पार्श्वभूमीवर परमेश्वर यांच्याशी जारकीहोळी यांनी बेळगाव येथील आपल्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री 2 वाजेपर्यंत चर्चा केल्याचे वृत्त आहे. सिद्धरामय्या यांनीही त्यांच्या मौनातून या निर्णयाशी सहमती दर्शविली, असे सूत्रांनी सांगितले. जर डी. के. शिवकुमार यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागल्यास उत्तर कर्नाटकातील सुमारे 20-25 काँग्रेस आमदार त्यांच्या राजकीय भविष्यासाठी भाजपकडे वळतील, असा संदेश सिद्धरामय्या गटाने यापूर्वीच हायकमांडला  पाठवल्याचे समजते.

या संदर्भात काही नेत्यांनी यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याचा प्रयत्न केला असून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यामार्फतही संदेश पाठवल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धरामय्या आमदारांच्या निर्णयानुसार पुढे जाण्याचा सल्ला हायकमांडला देण्याची शक्मयता आहे. तथापि, काही नेते परदेशात शिक्षण घेतलेले दलित नेते परमेश्वर यांना मुख्यमंत्रिपद देण्याची मागणी करत असल्याचे सांगितले जात आहे. डॉ. जी. परमेश्वर यांनी आठ वर्षे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले आहे. 2013 मध्ये पक्षाने सत्तेत येण्यासाठी त्यांनी कठोर परिश्र्रम घेतले होते. 2018 मध्ये, ते निजदसोबत युती सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाले आणि सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते.

शिवकुमारांनी राजण्णांची भेट घेतल्याने भुवया उंचावल्या

परमेश्वर यांचे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी चांगले संबंध आहेत. तथापि, परमेश्वर यांना मुख्यमंत्रिपद देण्यासाठी सिद्धरामय्या गट एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना कसे पटवून देणार आहे हे उत्सुकतेचे आहे. दरम्यान, डी. के. शिवकुमार यांनी शनिवारी संध्याकाळी बेंगळूरमध्ये माजी मंत्री के. एन. राजण्णा यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जर डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री झाले तर ते त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होणार नाहीतप्प्, असे राजण्णा यांनी यापूर्वी सांगितले होते.

Advertisement
Tags :

.