For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोदरेज प्रॉपर्टीजच्या प्रकल्पांना गतवर्षी सर्वोत्तम प्रतिसाद

06:38 AM Jan 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोदरेज प्रॉपर्टीजच्या प्रकल्पांना गतवर्षी सर्वोत्तम प्रतिसाद
Advertisement

विविध प्रकल्पात 16428 घरांची 2025 मध्ये विक्री

Advertisement

मुंबई :

बांधकाम क्षेत्रातील कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड यांच्या प्रकल्पातील घरांना 2025 मध्ये ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभल्याचे पहायला मिळाले. कंपनीने सदरच्या वर्षामध्ये घर बुकींग मूल्यामध्ये वार्षिक आधारावर 19 टक्यांची वाढ नेंदविली आहे.

Advertisement

देशातील ही सर्वात मोठी बांधकाम क्षेत्रातील कंपनी असून गेल्या दोन वर्षापासून सातत्याने बुकींग मूल्यामध्ये अग्रस्थानी राहण्यात यश मिळविले आहे. कंपनीने 2025 मध्ये बुकींग मूल्यामध्ये 19 टक्के वाढ दर्शवत 34,171 कोटी रूपये प्राप्त केले आहेत. 2022 ते 2025 या कालावधीत बुकींग मूल्यामध्ये वार्षिक तत्वावर 44 टक्के वाढ दिसून आली आहे.

प्रत्येक तिमाहीत सरस कामगिरी

कंपनीने वर्षाच्या प्रत्येक तिमाहीमध्ये 7 हजार कोटींपेक्षा अधिक मूल्याचे प्रकल्पांचे व्यवहार केले आहेत. कॅलेंडर वर्ष 2025 मध्ये गोदरेज प्रॉपर्टीजने एकूण 16,428 इतक्या घरांची विक्री केली.

Advertisement
Tags :

.