महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

होंड्यात गोदामाला आग, 25 लाखांचे नुकसान

06:16 AM Dec 01, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

Advertisement

वाळपई / प्रतिनिधी

Advertisement

होंडा औद्योगिक वसाहतीमधील पोनिस्को प्रा. लि. या फार्मास्युटिकल्स कंपनीच्या गोदामाला आग लागून सुमारे 25 लाखांचे नुकसान होण्याची घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर 2 वाजता घडली. वाळपई व  डिचोली अग्निशामक दलाने सुमारे सहा तास अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. कंपनीच्या विस्ताराचे काम सुरू होते, त्यावेळी fिवजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत वाळपई व डिचोली अग्निशामक दलाला कळविल्यानंतर रात्री अडीच वाजल्यापासून डिचोली व वाळपई अग्निशामक दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. गुरूवारी सकाळी 8 वा. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. यामध्ये जवळपास 25 लाखांची हानी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. एक कोटीची मालमत्ता वाचविण्यात अग्निशमन दलाच्या यंत्रणेला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोदामात ठेवलेला तयार माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. आग लागण्याचे निश्चित कारण काय, याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून मोठ्या प्रमाणात मालमत्ता वाचविण्यास दलाच्या यंत्रणेला यश आल्याचे यावेळी दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अग्निशामक दलाच्या केंद्राची गरज

दरम्यान पिसुर्ले व होंडा औद्योगिक वसाहत या शेजारीच आहेत. या ठिकाणी अनेक कंपन्यांची आस्थापने आहेत. वैद्यकीय प्लास्टिक, टायर, छोट्या गाड्यांचे सुटे भाग अशी अनेक प्रकारची उत्पादने या ठिकाणी केली जातात. मात्र आश्चर्याची बाब अशी की दोन्ही औद्योगिक वसाहतीसाठी आद्याप अग्निशामक दलाचे केंद्र या ठिकाणी सुरू झालेले नाही. सुरक्षिततेचा उपाय म्हणून या ठिकाणी अग्निशामक दलाचे केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी दोन्ही औद्योगिक वसाहतीच्या आस्थापन संघटनेच्यावतीने सरकारकडे करण्यात आले होते. मात्र त्याची आजपर्यंत दाखल घेण्यात आलेली नाही. या ठिकाणी अग्निशामक दलाचे केंद्र असते तर आज या कंपनीची जास्तीतजस्त नुकसानी टळली असती, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article