कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देवी अन्नपूर्णा

06:46 AM Sep 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पार्वती ही आई असल्यामुळे आपलीच मुलेबाळे अन्नावाचून तडफडताना बघून ती अस्वस्थ झाली आणि काशीक्षेत्री प्रगट झाली. तिथे तिने अन्नदान करायला सुरुवात केली. तेव्हा श्री शंकर तिच्या पुढ्यात भिक्षा मागावयास आले व म्हणाले, आत्मा ज्या देहात राहतो तो देह मोक्षाकडे जाण्याची शिडी आहे. त्या देहाचे भरणपोषण करणारे अन्न हे माया किंवा भ्रम नसून पूर्णब्रह्म आहे. तेव्हापासून पार्वतीला ‘अन्नपूर्णा’ हे नाव पडले.

Advertisement

सासरघरी जाताना नववधूला श्री अन्नपूर्णेची मूर्ती देण्याची पद्धत आजही रूढ आहे. अन्नपूर्णा हा पार्वतीमातेचा अवतार आहे. डाव्या हाती पानपात्र व उजव्या हाती पळी असलेल्या पार्वतीचे लक्ष शिवाकडे आहे. कथा अशी आहे की एकदा शंकर-पार्वती सारीपाट खेळत होते तेव्हा पार्वती मातेने तिचे दागिने आणि शंकराने आयुधे पैजेसाठी काढून ठेवली. खेळ सुरू झाला. शंकर पहिला, दुसरा आणि पैज लावून खेळलेला प्रत्येक डाव हरले. पार्वतीचा जय झाला. हा पराभव शंकराला सहन झाला नाही म्हणून ते उद्विग्न होऊन देवदारच्या जंगलात तपश्चर्येला निघून गेले. तिथे विष्णू त्यांना समजावायला गेले आणि त्यांनी शंकर-पार्वतीला पुन्हा डाव खेळण्यासाठी एकत्र आणले. तेव्हा मात्र प्रत्येक वेळी शंकराचाच विजय झाला आणि पार्वती माता हरली. अचानक असे काय झाले? पार्वतीला शंका आली. तिने विष्णूंना विचारले असता ते म्हणाले की या डावातील फासा माझ्या इच्छेने पडत होता. तुम्हा दोघांमधला खेळ हा भ्रम असून मायेमुळे तुम्हाला तो खरा वाटला. सृष्टी ही मायाधीन असून प्रत्येकाचे जीवन हे फाशाप्रमाणे अनाकलनीय आहे. या तिघांमध्ये मायेबाबत वाद रंगला. शिव म्हणाले, देह नश्वर असून क्षणभंगुर आहे. एवढेच नाही तर अन्न हाही भ्रम असून ते मायेचेच एक रूप आहे. हे विधान मात्र पार्वतीला पटले नाही. ती म्हणाली, अन्न हा जर भ्रम असेल तर मी सुद्धा एक भ्रमच आहे. असे म्हणून ती गुप्त झाली. पार्वती ही प्रत्यक्ष प्रकृती आहे. तिच्यामुळे तर जग चालते. ती निघून गेल्याने सृष्टी स्तब्ध झाली. सृष्टीचे ऋतू, मास, पर्जन्य सारे काही नाहीसे झाले. विश्वाची उत्पत्ती खुंटली आणि सर्वत्र दुष्काळ पडून अन्नटंचाई निर्माण झाली. मानव आणि देव काकुळतीला आले असे बघून शक्तीशिवाय आपण अपूर्ण आहोत हे शिवाच्या लक्षात आले.

Advertisement

पार्वती ही आई असल्यामुळे आपलीच मुलेबाळे अन्नावाचून तडफडताना बघून ती अस्वस्थ झाली आणि काशीक्षेत्री प्रगट झाली. तिथे तिने अन्नदान करायला सुरुवात केली. तेव्हा श्री शंकर तिच्या पुढ्यात भिक्षा मागावयास आले व म्हणाले, आत्मा ज्या देहात राहतो तो देह मोक्षाकडे जाण्याची शिडी आहे. त्या देहाचे भरणपोषण करणारे अन्न हे माया किंवा भ्रम नसून पूर्णब्रह्म आहे. तेव्हापासून पार्वतीला ‘अन्नपूर्णा’ हे नाव पडले.

अयोध्यानगरीचा प्राचीन इतिहास वाचला तर त्यात एक वेगळी कथा आढळते. उज्जैनी नगरीचा नरेश विक्रमादित्य याने श्रीरामजन्मभूमीचा शोध लावला. राजाला हा शोध काशी विश्वनाथाच्या आशीर्वादाने लागला. अयोध्येमध्ये येऊन जेव्हा श्रीराम जन्मभूमी नेमकी सापडत नव्हती तेव्हा राजा विक्रमादित्य अस्वस्थ झाला. अयोध्येमध्ये निर्मलीकुंडामध्ये रोज तीर्थराज प्रयाग सगुण रूप धारण करून स्नानास येतात. तिथे राजाने जाऊन त्यांना नमस्कार करून आपली व्यथा सांगितली. तेव्हा प्रयागराज म्हणाले की तू आता येथून काशीक्षेत्रात जा आणि विश्वनाथाची आराधना कर. त्यानुसार राजा काशीक्षेत्री अन्नपाणी वर्ज्य करून शिवनामाचा उच्चार करीत दृढ संकल्प करून तपाला बसला. राजाचा दृढभाव पाहून भोलेनाथ प्रसन्न झाले आणि राजाला म्हणाले की ही अन्नपूर्णा नगरी आहे. अशा ठिकाणी निराहार राहणे योग्य नाही. मी तुला एक पोथी व कामधेनू देतो. त्यांच्या प्रेरणेनुसार तुला रामजन्मभूमीचा शोध लागेल. विश्वनाथाच्या कृपेने राजाला भूमी सापडली. महत्त्वाचे आहे की काशीक्षेत्री उपाशी राहिलेले भोलेनाथ व देवी अन्नपूर्णा यांना आवडत नाही. उपासापेक्षा उपासना देवी अन्नपूर्णेला प्रिय आहे.

शुभविवाह प्रसंगी सप्तपदी हा विधी महत्त्वाचा आहे. यात वधू सात पावले वराबरोबर चालत सात प्रतिज्ञा करते. त्यात तिसरे पाऊल टाकताना ती म्हणते, ‘मी रोज तुमच्या आज्ञेचे पालन करीन व वेळेवर गोड अन्न आणि स्वयंपाक तयार करून देईन’. या प्रतिज्ञेमागचा सुंदर अर्थ पू. पांडुरंगशास्त्राr आठवले यांनी उलगडून सांगितला आहे. वधू वराला आश्वस्त करते की तुमच्या आज्ञेनुसार मी तुम्हाला रोज चविष्ट, स्वादिष्ट मधुर जेवण वाढीन. त्यात मिष्टान्न असा शब्द आहे. पू. शास्त्राrजी म्हणतात, मिष्टान्न याचा पहिला अर्थ, घरातल्या व्यक्तीच्या मनासारखा स्वयंपाक तयार करणे. दुसरा अर्थ, घरातील वातावरण गोड राहील अशी परिस्थिती आपल्या वागण्यातून तयार करणे आणि तिसरा अर्थ, जो कोणता पदार्थ घरामध्ये घरामधील स्मितवदनाने गृहिणी ताटात वाढेल तो गोडच लागेल. घरामध्ये तिने जोपासलेले, संवर्धन केलेले प्रेमळ मधुर संबंध साध्या भाजीभाकरीला मिष्टान्नाची गोडी आणतील. भोजनगृहाची तू सम्राज्ञी हो. हा पूर्वजांचा विचार वधूबरोबर हाती पळी घेतलेली अन्नपूर्णा देताना असेल का?

स्वयंपाकघराचे वर्चस्व सासूकडे असायचे म्हणून एकेकाळी घरात धुसफूस भांडणे होत असत. त्यावरूनच मग सुनेची वेगळी चूल तयार होत असे. कुटुंब विभक्त होण्याचे हेही एक प्रमुख कारण होते. पुढे शिक्षणाने स्त्रियांना आत्मनिर्भर केले तेव्हा त्यांचे लक्ष स्वयंपाकघरातून उडून गेले. उलट चुलघरात रमणे त्यांना अप्रतिष्ठेचे वाटू लागले. त्यामुळे आर्थिक मोबदला घेत स्वयंपाकघरात बाहेरून आलेल्या मंडळींचा वावर वाढला. एक चमचा हरवला तर अस्वस्थ होणाऱ्या स्त्रियांच्या मनात यूज अँड थ्रो हा संस्कार पक्का रुजला. तो व्यवहारातून रक्तातही उतरला. स्त्रियांचीच मिरासदारी असलेल्या स्वयंपाकघरात काळानुसार पुरुषांनी मोठ्या उजागिरीने प्रवेश केला. सद्यकाळात स्त्राr-पुरुष ही कामाची वाटणी न राहिल्याने कुठलेही प्रश्न उरले नाहीत. सुप्रसिद्ध विदुषी दुर्गाबाई भागवत यांनी नोंदवलेले प्राचीन काळातील स्वयंपाकघर फार महत्त्वाचे आहे. तो इतिहास जाणून घ्यायला हवा. त्या म्हणतात, वेदकाळात पुरोडाश नावाचा आजच्या काळातील इडलीसारखा पदार्थ नैवेद्यासाठी तयार करीत असत. त्याचे वैशिष्ट्या म्हणजे तो फक्त पुरुषांनीच तयार करायचा. प्राचीनकाळी बाईला स्वयंपाकीण म्हणून कोणी वागवले नाही. मोठ्या प्रमाणावरचा स्वयंपाक पुरुषच तयार करीत. महाभारतातील भीम हा नवे नवे पदार्थ तयार करायचा. तो फळे घालून श्रीखंड करायचा. त्याला शिखरिणी असे नाव होते. श्रीकृष्णाने घीवर हा पदार्थ शोधून काढला. नलदयमयंती आख्यानातील नलराजांनी पाण्याचा बर्फ कसा तयार करायचा हे शोधून काढले. तो अग्नीशिवाय स्वयंपाक तयार करत असे. समर्थ रामदास स्वामींचे शिष्य रघुनाथ यांनी जिलेबीचा शोध लावला. त्यांनी तिला नाव दिले आहे कुंडलिका. त्यांचे पाकशास्त्रावर पुस्तक आहे.

कलियुगात माणसाचा श्वास अन्नावर अवलंबून आहे. त्यामुळे स्वयंपाक ही एक साधना आहे. ती मनापासून कुणीही स्त्राr-पुरुष यांनी करावी. स्वयंपाक करण्याआधी देवी अन्नपूर्णेची प्रार्थना करावी. ‘अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे । प्रसीद देवी कल्याणी मम कामान् प्रपूरय’? देवीला नमस्कार करून जेवू घालावे आणि जिवांना तृप्त करावे. मनभरून समाधान अनुभवावे.

- स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article