For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | शाहूवाडीतील टेकुलीत गव्याचा शिरकाव; वन विभागाची धाव

01:09 PM Mar 03, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   शाहूवाडीतील टेकुलीत गव्याचा शिरकाव  वन विभागाची धाव
Advertisement

                    उन्हामुळे अशक्त गवा ओढ्यात बसला; ग्रामस्थांची गर्दी

Advertisement

शाहूवाडी -टेकोली येथे रविवारी सकाळी प्रदीप भगवान जाधव व बसंत भागोजी जाधव यांच्या घराजवळून गब्याने गावात प्रवेश केला. उन्हाचा त्रास आणि अशक्त असल्याने गवा त्याच ठिकाणी बसला. या संबंधीची माहिती वन विभागाला तत्काळ देण्यात आली. घटनास्थळी लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती तर वन विभागाची रेस्क्यू टीम देखील दाखल झाली होती.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळच्या दरम्यान, गब्याने टेकुली गावात प्रवेश केला. लोकांचा गलगलाट व उन्हाचा त्रास यामुळे गवा गावापासून काहीअंतरावर असलेल्या एका ओढ्यात बसला. दरम्यान, हा गवा अशक्त असल्याने त्याला हालचाल करता येत नसल्याची प्राथमिक माहिती वन विभागाने दिली. गब्यावर उपचार करण्यासाठी बन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी व पंचायत
समितीच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वृषाली सरवदे यांनी घटनास्थळी जावून उपचार केले.

Advertisement

गवा गावात आल्याची माहिती समजताच ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कांबळे, माजी सरपंच शामराव पाटील, जालिंदर पाटील,  गुणगुडे, दिलीप पाटील, आनंदा जाधव, शामराव जाधव यांच्यासह ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या उज्ज्वला मगदूम मार्गदर्शनाखाली बन विभागाचे ऋषिकेश झांजुर्णे, गुरु बचन, अक्षय चौगुले, दक्षता पथकाचे सुरेश पाटील, अविनाश पाटील, तुकाराम थोरवे, शिवाजी पाटील, बनसेवक राजाराम बसरे, संतोष बाळवेकर हे बन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.