For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News: ऐकावं ते नवलं, शेळ्यांनी कर्णवेल गिळली ऑपरेशन करुन बाहेर काढली

12:39 PM May 21, 2025 IST | Snehal Patil
sangli news  ऐकावं ते नवलं  शेळ्यांनी कर्णवेल गिळली ऑपरेशन करुन बाहेर काढली
Advertisement

दोन्ही शेळ्यांची प्रकृती उत्तम असल्याचेही डॉ. विजय ढोके यांनी सांगितले

Advertisement

सांगली (सोनी) : येथील शेतकऱ्याच्या घरातील दोन शेळ्यांनी गिळलेले सोन्याचे कर्णवेल शेळ्यांच्या पोटाची शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात आले. मिरजेच्या पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातील पशू रुग्णालयात ही शस्त्रक्रिया केली. शेळ्यांच्या पोटात सोन्याचे दोन कर्णवल सापडले.

मिरज तालुक्यातील सोनी येथील प्रकाश गाडवे या शेतकऱ्याच्या मुलीने घरात भांडी घासताना तिच्या दोन्ही कानातील काढून ठेवलेल्या सोन्याच्या कर्णवल खरकट्या पाण्यामध्ये पडल्या होत्या. तेच खरकटे पाणी त्यांच्या दोन्ही शेळ्यांनी पिले. खरकट्यासोबत त्या कर्णवलही गिळल्या.

Advertisement

कर्णवल गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या शेळ्यांनी गिळल्याचा गाडवे यांचा अंदाज होता. गाडवे यांनी मिरजेच्या शासकीय पशु रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय ढोके यांच्याशी संपर्क साधला. गाडवे यांच्या पाच वर्षे वयाच्या दोन्ही शेळ्यांच्या पोटाचा एक्स-रे काढल्यानंतर पोटात धातू असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे डॉक्टर ढोके यांनी शनिवारी १७ मे रोजी दोन्ही शेळ्यांची पोटाची शस्त्रक्रिया (रुमीनाटॉमी) करून प्रत्येकी २ ग्रॅमचे सुमारे ३० हजारचे दोन कर्णवल काढले.

शस्त्रक्रियेचा खर्च ११४० रुपये

सध्याच्या काळामध्ये कोणत्याही शस्त्रक्रियेचा खर्च हा वाढला असून हे आकडेच खूप मोठे असतात. मात्र मिरजेच्या शासकीय पशू रुग्णालयातील शस्त्रक्रियेसाठी दोन तास वेळ लागला. शासकीय फी प्रत्येकी ७० रुपये व संसर्ग होऊ नये यासाठीच्या औषधांसाठी ५०० रुपये असा ११४० रुपयांचा खर्च गाडवे यांना करावा लागला. मात्र, ३० ते ३५ हजाराचे दागिने त्यांना परत मिळाले.

डॉ. विजय ढोके म्हणाले की, शेळ्या, गाय, म्हैस, बैल हे प्राणी काही खाल्ल्यानंतर रवंथ करतात. त्यांच्या पोटाची रचना चार कप्याची असते. या प्राण्यांनी सुई, तार, खिळा, मोळा गिळल्यास त्यांच्या हृदयाला इजा होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा वस्तू तातडीने बाहेर काढाव्या लागतात. मात्र दागिने अथवा अन्य न टोचणाऱ्या वस्तू त्या पोटात राहिल्यास प्राण्यालाही त्रास होत नाही. प्राण्यांनी मिळालेले हे धातू पोटामधील दुसरा टप्पा (रेटीकुलोम) आहे शेळ्यांनी सोन्याची कर्णवल गिळल्याने त्यांची पोटाची शस्त्रक्रिया करावी लागली. दोन्ही शेळ्यांची प्रकृती उत्तम असल्याचेही डॉ. विजय ढोके यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.