शेळीपालन, बचतगट, पशुखाद्य निर्मिती... स्वाती अस्वले यांचा यशस्वी प्रवास
कोल्हापूर / राधिका पाटील :
ग्रामीण भागात काहीतरी नवीन स्वतंत्र लघुउद्योग करण्याची उर्मी खुणावत होती, त्यातूनच सौ. स्वाती आनंद अस्वले (मु. पो. चिमणे ता. आजरा, जि. कोल्हापूर) या कर्तृत्ववान महिलेने लघुउद्योगात आपली वेगळी ओळख निर्माण केली. आहे. शेती कामाशी त्यांचा विवाहापूर्वी कोणताही संबंध नव्हता, मात्र त्यांचे सासरे गोविंद शिवा अस्वले यांनी त्यांना स्वयंपूर्ण व्यवसायासाठी प्रेरणा दिली, लग्नानंतर त्यांनी पशुखाद्य निर्मितीचा उद्योग सुरू केला, बंदिस्त शेळीपालनाचा स्वाती अस्वले व्यवसायही त्यांनी यशस्वी करून दाखविला, लहान मुलांना अध्यापनाच्या माध्यमातून संस्कारित करत आहेत, त्यांनी सर्व महिलांना एकत्र करत बचतगटही अत्यंत चांगल्या प्रकारे चालवला आहे. या माध्यमातून महिलांना, गरजूंना त्या मार्गदर्शनही करत असतात.
सासरी पशुखाद्य उत्पादनाच्या छोट्या उद्योगाची त्यांनी उभारणी केली. परिसरातील दूध उत्पादक शेतकयांनी त्यांच्या उत्पादनाचे हसतमुखाने स्वागत केले. पती आनंद अस्वले त्यांना व्यवसाय व्यवस्थापन कामात मदत करतात, सासूबाई सुद्धा शेळीपालन, पशुखाद्य उत्पादन कामात सहकार्य करतात. त्यांना धडपडत रहायला आवडतं. परिस्थितीत बदल करायचा म्हणून त्यांनी व्यवसाय धाडस केले आणि नशिबाचे दरवाजे अपोआप उघडले गेले. हा अनुभव त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून घेतलाय. माहेरी आई वडीलांचे सतत पाठबळ व आशिर्वाद त्यांना मिळाले. आजही हे आशिर्वाद, मार्गदर्शन सोबत आहेतच. जिद्द, चिकाटी, मेहनत, प्रामाणिकपणा, घडपड या पंचसुत्रीच्या जीवावर त्यांनी व्यवसायात यश खेचून आणले आहे. शिकवायला आवडते म्हणून त्यांनी गावातील मुलांना अध्यापन केले आहे. सोबत बंदीस्त शेळीपालन व्यवसायही करतात. उस्मानाबाद यशस्वीपणे संगोपन केले आहे शेतीतही नवनवीन प्रयोग सुरुव आहेत. त्यांचे सारे जगणेच प्रयत्नवादी आहे. माहेरी त्यांच्यावर झालेले श्रमाचे संस्कार आज सासरी उपयुक्त ठरत आहेत. त्यांच्याकडे संस्काराची, संशोधनाची शिदोरीच आहे. इतर खेडूत महिलांनाही चांगले मार्गदर्शन त्या करतात. बचतगटही खूपच चांगला चालवला आहे.
मनगटातील ताकदीच्या जोरावर त्यांनी व्यायसायीक गरुडभरारी घेतती आहे खेड्यात राहणाऱ्या महिलाही खूप जिद्दी असतात हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. व्यवसायात कोणीही नोकर नाहीत. स्वतःच्या कष्टाने उत्पादन घेत आहेत. त्यांचे अखंड जगणे इतरांनी आदर्श घ्यावा असे आहे. गारगोटी येथील मुराळी मासिकांच्या संपादकांनी त्यांचा मान पत्र देऊन सन्मान केला व मासिका मध्ये त्यांच्या कार्याविषयीं लेख लिहिला. तसेच ज्ञानेधर मुळे यांच्या सारख्या दिग्गज साहित्यिकांच्या कार्यक्रमात सूत्रसंचलन करण्याचा मान त्यांना मिळाला त्यांचे मार्गदर्शन घेऊन खेड्यातील महिलांनी स्वातीताईंकडून प्रेरणा घेण्यासारखी आहे. त्यांच्या लघु उद्योगाचा परीघ वाढत आहे. लपूउद्योजीका म्हणून स्वाती अस्वले यांनी घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे.