For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘गोट’फेम अभिनेत्री पार्वती विवाहबद्ध

06:49 AM Feb 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘गोट’फेम अभिनेत्री पार्वती विवाहबद्ध
Advertisement

उद्योजक आश्रित अशोकसोबत थाटला संसार

Advertisement

विजय थलापतिचा चित्रपट ‘गोट’मध्ये दिसून आलेली अभिनेत्री पार्वती नायरने विवाह केला आहे. अभिनेत्रीने उद्योजक आश्रित अशोकला आयुष्याचा साथीदार म्हणून निवडले आहे. पार्वतीच्या विवाहाची छायाचित्रे समोर आली असून चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. पार्वती नायरने आश्रित अशोकसोबत चेन्नईत एका खासगी सोहळ्यात विवाह केला आहे. या सोहळ्याला दोघांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवारानेच हजेरी लावली होती. हा विवाहसोहळा तमिळ प्रथा-परंपरांद्वारे पार पडला आहे.

या सोहळ्याकरता पार्वतीने आइवरी गोल्डन कलरची साडी परिधान केली होती. पार्वतीने विवाहाची छायाचित्रे शेअर करताच तिच्या मित्रांनी तसेच चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. पार्वती ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील गुणवान अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Advertisement

Advertisement
Tags :

.