विकसित भारतासाठी गोव्याचे सर्वतोपरी योगदान
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे उद्गार : पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील,नीती आयोगाच्या बैठकीत उद्गार
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे बाळगलेले स्वप्न हे सामूहिक प्रवासाचा भाग आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गोवा राज्य सर्वतोपरी योगदान देण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यादिशने गोवा राज्याची वाटचाल सुरू आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीत दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दहावी नीती आयोगाची बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच इतर राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे नीती आयोगाच्या 10 व्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत भाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक 2047 मध्ये विकसित भारतासाठी विकसित राज्याच्या दृष्टिकोनावर केंद्रित असल्याचे एचसीएम यांनी सांगितले. परिवर्तनकारी राष्ट्रीय ध्येय साध्य करण्यासाठीच्या रणनीतींवर चर्चा करण्यात आली.