For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्याच्या आर्थिक प्रगतीला बळ मिळणार

07:37 AM Sep 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोव्याच्या आर्थिक प्रगतीला बळ मिळणार
Advertisement

विकसित भारताच्या निर्मितीमध्ये गोवा आपले पूर्ण योगदान देण्यास कटिबद्ध आहे. केंद्राच्या आर्थिक धोरणांशी सुसंगत राहून गोव्यातील पायाभूत सुविधांचा विकास आणि राज्याची आर्थिक घडी अधिक मजबूत करण्यासाठी ‘फायनान्सिंग इंडियाज जर्नी टुवर्ड्स विकसित भारत’ या परिषदेतील चर्चा आणि विचार विनिमय अत्यंत फायदेशीर ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

त.भा. प्रतिनिधी

पणजी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘फायनान्सिंग इंडियाज जर्नी टुवर्ड्स विकसित भारत’ या अत्यंत महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषदेत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल, शुक्रवारी अधिकृतपणे उपस्थिती लावली. त्यानंतर बोलताना त्यांनी वरील माहितील दिली.  या परिषदेत देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते. या उच्चस्तरीय परिषदेतील चर्चा प्रामुख्याने देशातील सार्वजनिक वित्त पुरवठा मजबूत करणे, विकासासाठी संसाधने जमा करणे आणि गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणावर चालना देणे या मुद्यांवर केंद्रित होती. वर्ष 2047 पर्यंत भारताला पूर्णपणे विकसित राष्ट्र बनवण्याच्या प्रवासाचा वेग वाढवण्यासाठी नवनवीन आणि नाविन्यपूर्ण वित्तीय उपायांचा  शोध घेण्यावर सर्व राज्यांनी या बैठकीत एकमताने भर दिला.

Advertisement

ही परिषद केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमधील परस्पर सहकार्य आणि विचार विनिमयासाठी एक अत्यंत मौल्यवान व्यासपीठ ठरली आहे. प्रत्येक राज्याची अर्थव्यवस्था अधिक बळकट, लवचिक आणि स्वावलंबी बनवण्यासाठी या परिषदेत अनेक धोरणात्मक निर्णय आणि दूरगामी उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली.

Advertisement
Tags :

.