For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनमोड अबकारी चेक नाक्यावर गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त

06:15 AM Aug 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
अनमोड अबकारी चेक नाक्यावर गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त
Advertisement

 रामनगर/ वार्ताहर

Advertisement

अनमोड अबकारी चेक नाक्यावर शुक्रवार दि. 28 ऑगस्ट रोजी पहाटे गोवा येथून हुबळीच्या दिशेने एक्टिवा दुचाकी क्रमांक केए 25 इव्ही 4199 जाताना  दुचाकीची तपासणी केली असता दुचाकीमध्ये गोवा बनावटीचा 28.25 लिटर दारू साठा सापडला. दुचाकीसह गोवा बनावटीचा दारूसाठा आबकारी अधिकाऱ्यांनी जप्त केला. याप्रकरणी नवीन चेन्नया दार, राहणार विनोबानगर गदग रोड हुबळी याला ताब्यात घेतले आहे. यावेळी जप्त करण्यात आलेल्या गोवा बनावटीच्या  दारूची अंदाजे किंमत 16500 तसेच ऍक्टिवाची अंदाजे किंमत 60000 असा एकूण 76 हजार 500 रुपयाची मालमत्ता अनमोड अबकारी विभागाने जप्त केली आहे.

सदर कारवाई अबकारी पोलीस निरीक्षक महेंद्र नाईक, हवालदार संतोष सुबनावर, अलीसाब अनवटी. तसेच कर्मचारी गजानन नाईक यांनी केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.