सातोळी चेकपोस्टवर गोवा बनावटीची दारू ताब्यात
वार्ताहर/ आंबोली
फोटो - विजय राऊत
सातोळी - बावळाट तिठा येथे वाहतुक पोलीस चेकपोस्टवर मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गोवा येथून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका महिंद्रा बोलेरो पीकप गाडीची तपासणी केली असता या कारमधून गोवा बनावटीची सुमारे १ लाख ३५ हजार किंमतीची गोवा बनावटीची दारू सापडून आली .यावेळी गोवा बनावटीची दारू आणि बोलेरो कारसह एकूण ४ लाख ३५ हजार रुपये किंमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गाडीतील मोहसीन मनसुब काझी (वय-२८) , रा. माढा, जि. सोलापूर, आणि औदुंबर पोपट सावंत , (वय-३८वर्षे), रा. माढा , जि. सोलापूर या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार रामदास जाधव करीत आहेत. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. मोहन दहीकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री कृषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रामदास जाधव, पोलीस नाईक मनीष शिंदे, सातुळी बावळाट तीठा येेथील वाहतुक शाखेचे पोलिस अंमलदार सहा. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बांदेकर , हवालदार अमोल गोसावी यांच्या पथकाने केली.